सरकारी शाळेतील शिक्षकाचं संतापजनक कृत्य; तिसरी, चौथीच्या विद्यार्थिनींना दाखवला घाणेरडा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सरकारी शाळेतील शिक्षकाचं संतापजनक कृत्य; तिसरी, चौथीच्या विद्यार्थिनींना दाखवला घाणेरडा व्हिडिओ

सरकारी शाळेतील शिक्षकाचं संतापजनक कृत्य; तिसरी, चौथीच्या विद्यार्थिनींना दाखवला घाणेरडा व्हिडिओ

Dec 16, 2024 05:20 PM IST

Rajasthan Government School Teacher News: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत इयत्ता तिसरी आणि चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना घाणेरडा व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली.

सरकारी शाळेतील शिक्षकाचं संतापजनक कृत्य; तिसरी, चौथीच्या विद्यार्थिनींना दाखवला घाणेरडा व्हिडिओ
सरकारी शाळेतील शिक्षकाचं संतापजनक कृत्य; तिसरी, चौथीच्या विद्यार्थिनींना दाखवला घाणेरडा व्हिडिओ

Rajasthan News: देशात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचारात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा घटनेतील दोषींविरोधात कठोर पावले उचलली जात असताना गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हे प्रकरण राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील बल्हेरी पोलीस ठाण्यात आहे. या घटनेबाबत बल्हेरी पोलीस ठाण्याचे अधिकारी हनुमान सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षक अल्पवयीन मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यासोबत घाणेरडे कृत्य करायचा. याबाबत एका विद्यार्थिनीने पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीसह शाळेतील अन्य चार मुलींना शिक्षकांनी अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यासोबत घाणेरडे कृत्य केल्याची पोलिसांत तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्राम मीना असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. आरोपीने सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या कार्यालयात बोलावून अश्लील व्हिडिओ दाखवला. तसेच त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी इयत्ता तिसरी व चौथीच्या निष्पाप विद्यार्थिनींचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांच्याविरोधात कडक कारवाई करून शिक्षा केली जाईल,असे पोलिसांचे स्पष्ट केले आहे.

आई-वडिलांनंतर शिक्षक हेच आपले दुसरे गुरु असतात. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा असतो. परंतु, राजस्थान येथे घडलेल्या अशा धक्कादायक प्रकारामुळे पालकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर