मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mob attack : रायपूरमध्ये जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर जमावाचा हल्ला, तिघांचा मृत्यू

Mob attack : रायपूरमध्ये जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर जमावाचा हल्ला, तिघांचा मृत्यू

Jun 18, 2024 05:37 PM IST

mob attack : भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे

Representational image.
Representational image.

छत्तीसगडमधील रायपूर येथे जमावाने जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन जणांवर केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा मंगळवारी रायपूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला.

रायपूरच्या अर्नाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावाने केलेल्या हल्ल्यात गुड्डू खान (३५) आणि चांद मिया खान (२३) यांचा मृत्यू झाला होता. तर सद्दाम कुरेशी गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता. कुरेशी यांना सोमवारी खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळपर्यंत ते व्हेंटिलेटरवर होते.

ट्रेंडिंग न्यूज

रायपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) कीर्तन राठोड यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, सद्दामचा मंगळवारी डीकेएस रुग्णालयात मृत्यू झाला. मृत तिघेही उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील रहिवासी होते.

सद्दाम या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी असल्याने आम्ही त्याच्या जबाबाची वाट पाहत होतो. आता तो हयात नसल्याने आम्ही अन्य पुराव्यांवर काम करू. सद्दामच्या चुलत भावाने त्याच्याशी फोनवर काही मिनिटे बोललेल्या जबाबाच्या आधारे अटक केली जाईल. आम्ही काही लोकांची ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि अटक करण्यासाठी छत्तीसगड पोलिसांनी स्थापन केलेल्या १४ सदस्यीय विशेष पथकाचे नेतृत्व राठोड करीत आहेत. अरंग पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, ७ जूनच्या रात्री घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चांद मियाँ आणि गुड्डू आणि जखमी सद्दाम यांचे मृतदेह ताब्यात घेतले.

भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी चांद आणि सद्दामचा चुलत भाऊ शोएबने सांगितले की, जमावाने तिघांवर हल्ला केला होता.

"चांद यांनी मला सांगितलं की, जमावाकडून त्यांच्यावर हल्ला केला जात आहे. पण तो काही तपशील देण्याआधीच कॉल कट झाला,' असे शोएबने सांगितले. शोएबने सांगितले की, मोहसीनला ४७ मिनिटे चाललेल्या दुसऱ्या कॉलमध्ये सद्दाम आपले हातपाय तुटल्याचे सांगताना ऐकू आला.

सद्दाम आपल्या हल्लेखोरांना त्याला सोडण्याची विनवणी करत होता. मला विश्वास आहे की सद्दामने मोहसीनला कॉल करताना त्याचा फोन खिशात ठेवला होता आणि तो कधीही डिस्कनेक्ट झाला नाही त्यामुळे सर्व काही स्पष्टपणे ऐकू येत होते, असे शोएब म्हणाला.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर