RRB JE Recruitment 2024: रेल्वेने मेगा भरती जाहीर केली आहे. रेल्वे भरती मंडळाने कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली कसून तब्बल ७ हजार ९३४ कनिष्ठ अभियंता पदे भरली जाणार आहे. यात डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट पदांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांना रेल्वेसेवेत भरती व्हायचे आहे, अशा बेरोजगार तरूणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी रेल्वेची अधिकृत वेबसाइट rrbappy.gov.in ला भेट द्यावी.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीसाठी संक्षिप्त अधिसूचना जारी केली आहे. ३० जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट २०२४ आहे. अर्जाची फी भरण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट आहे.
ओपन, ओबीसी आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना संगणक आधारित चाचणी (CBT Stgage 1) साठी अर्ज करण्यासाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी आणि एसटी आणि महिला उमेदवारांना संगणक आधारित चाचणी (CBT Stgage 1) साठी अर्ज करण्यासाठी २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या अर्जामध्ये बदल किंवा एडिट करण्यासाठी उमेदवाराला २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
१. उमेदवाराचे वय १८ ते ३६ वर्षे दरम्यान असावे.
२. उमेदवाराकडे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. JE (IT), रासायनिक शैक्षणिक पात्रता असावी.
३. मेटलर्जिकल असिस्टंट कनिष्ठ अभियंता पदांसाठी, उमेदवाराला ३५,४०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
उमेदवारांना प्रथम संगणक आधारित चाचणी (CBT Stgage 1) द्यावी लागणार आहे. ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. यानंतर संगणक आधारित चाचणी (CBT Stgage 2) होईल. ज्यामध्ये तांत्रिक आणि विषयाशी संबंधित प्रश्न प्रश्न विचारले जातील. यानंतर, या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
RRB कनिष्ठ अभियंता परीक्षा २०२४ मध्ये, सामान्य जागरूकता, गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य विज्ञान आणि तांत्रिक क्षमतांशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
संबंधित बातम्या