Indian Railways Recruitment 2024 : भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी रेल्वेसेवा आहे. रेल्वेत नोकरी करण्याचे अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. भारतीय रेल्वे बोर्डाने देशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी मोठ्या भरतीचे आयोजन केले आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू केली जाणार असून या भरतीची अधिसूचना व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही बेरोजगार असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही संधी वाया घालवू नका. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी कसा अर्ज करावा ? या साठी लागणारी पात्रता काय आहे ? जाणून घेऊयात.
रेल्वे विभागाकडून ११,५५८ पदांवर ही भरती घोषित केली आहे. यामध्ये कनिष्ठ लिपीक, लेखा लिपीक, वरिष्ठ लिपीक, लेखा सहायक, कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्तर अशी विविध पदे भरली जाणार आहे. यात ८,११३ पदवीधर पदे आणि ३,४४५ पदवीधर पदांचा समावेश आहे. रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) भारतीय रेल्वेमध्ये नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) पदांच्या ११५५८ रिक्त जागांसाठी या वर्षी भरती जाहीर केली आहे. आरआरबी एनटीपीसी २०२४ च्या अधिसूचनेत या भरतीचा उल्लेख केला जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आपल्या जाहिरातीत म्हटले आहे की, "नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट पदांच्या भरतीसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज फक्त ऑनलाइन सादर करता येणार आहे.
पदवीची ३ हजार ४४५ पदे तर पदवीची ८ हजार ११३ पदे या भरती अंतर्गत भाकरळी जाणार आहे. या साठी पदवीधर उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डाकडून बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता सादर करावी लागणार आहे. पदवीधर उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पदवीधर पद : उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.
पदवीधर पद : उमेदवाराचे वय १८ ते ३६ वर्षे दरम्यान असावे.
कोरोनामुळे विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त वयात तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
पदवीधर पदांसाठी १४ सप्टेंबर पासून अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२४ आहे. १३ तारखेला रात्री १२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
पदव्युत्तर पदांसाठी २१ सप्टेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.
एकूण पदे – १०८८४
पदवीपूर्व पदे – ३४०४
पदवीधर पदे – ७४७९
कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक – ९९० पदे
लेखा लिपिक सह टंकलेखक – ३६१ पदे
ट्रेन क्लर्क – ६८ पदे
कमर्शियल कम तिकीट लिपिक – १९८५ पदे
गुड्स ट्रेन मॅनेजर – २६८४ पदे
चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक – १७३७ पदे
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – ७२५ पदे
कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – १३७१ पदे
स्टेशन मास्तर – ९६३ पदे
indianrailways.gov.in. या साईटवर जाऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल. या साठी ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही ती लवकरच सुरू होणार आहे. या बाबत indianrailways.gov.in. या साईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.