Raigad: जेवण बनवलं नाही म्हणून बायकोची हत्या, नवऱ्याला अटक; रायगड येथील घटना-raigad man kills his wife over not cooking in pen ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Raigad: जेवण बनवलं नाही म्हणून बायकोची हत्या, नवऱ्याला अटक; रायगड येथील घटना

Raigad: जेवण बनवलं नाही म्हणून बायकोची हत्या, नवऱ्याला अटक; रायगड येथील घटना

Sep 30, 2024 11:00 AM IST

Raigad Man Kills Wife: रायगड येथे जेवणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली.

रायगड: जेवणावरून झालेल्या वादातून बायकोची हत्या
रायगड: जेवणावरून झालेल्या वादातून बायकोची हत्या (HT_PRINT)

Raigad News: रायगडमधील पेण येथून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका व्यक्तीने जेवण बनवले नाही म्हणून बायकोची हत्या केली. याप्रकरणी रायगड पोलिसांनी महिलेच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. किरकोळ कारणामुळे नवऱ्याने बायकोची हत्या केल्याने परिसरात खळबळ माजली.

गोपीनाथ वाघमारे (वय, ४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, भारती गोपीनाथ वाघमारे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेवणावरून आरोपी आणि मयत भारती यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. जेवण का बनवले नाही? यावरून आरोपीने भारतीला बेदम मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात तिचे डोके भिंतीवर आपटले. या घटनेत भारतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

कोल्हापूर: धावत्या बसमध्ये जावयाची हत्या

कोल्हापूरात दारू पिऊन मुलीला त्रास देणाऱ्या व्यक्तीची त्याच्या सासू- सासऱ्याने धावत्या बसमध्ये गळा आवळून हत्या केली. ही घटना बुधवारी (२५ सप्टेंबर) दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप शिरगावे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो कोल्हापुरातील शिरोळ येथे वास्तव्यास होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह बसमध्ये आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती उघड झाली. संदीपचा त्याच्या सासू-सासऱ्यानेच हत्या केल्याची तपासात निष्पन्न झाले.याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप शिरगावेला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो बायकोला शिवीगाळ आणि मारहाण करत असे. त्याला अनेकदा समजावूनही त्याने पत्नीला त्रास देणे थांबवले नाही. मुलीला होणारा त्रास सहन न झाल्याने आरोपींनी जावयांची हत्या केली.

पुणे: करणी केल्याच्या संशयातून पुजाऱ्याची हत्या

पुण्यातील हातवे खुर्द येथे करणी केल्याच्या संशयातून एका पुजाऱ्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी का इस्टेट एजंटला अटक केली. गणपत गेनबा खुटवड (वय ५२,) असे खून झालेल्या पुजाऱ्याने नाव आहे. तर, स्वप्नील खुत्वड (वय, ३२) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner
विभाग