Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सोमवारी (२२ जानेवारी) आसाममधील नागाव येथील शंकरदेव मंदिरात जाण्यापासून रोखले. अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राहुल गांधींना शंकरदेव मंदिरात प्रार्थना करायची आहे. मात्र, त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखल्याने काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
राहुल गांधींना आज आसाममधील शंकरदेव मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले, जिथे त्यांना आमंत्रित करण्यात आले. मात्र, नंतर मंदिरात जाऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. यामुळे राहुल गांधींनी कदाचित आज एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता लगावला आहे. दरम्यान, आम्हाला मंदिरात जायचे आहे. मी कोणता गुन्हा केला आहे की, मला मंदिरात जाऊ दिले जात नाही? असा सवाल राहुल गांधींनी त्यावेळी विचारला.
राहुल गांधींना दुपारी ३ नंतर मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली. ठाणे व्यवस्थापन समितीने रविवारी सांगितले की, 'राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येणार आहेत. याशिवाय, मंदिराच्या बाहेर आणि आतही अनेक कार्यक्रम होणार आहेत, जिथे हजारो लोक जमणार आहेत. या कारणास्तव राहुल गांधींना दुपारी ३ नंतर मंदिरात जाण्यासाठी वेळ देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखल्यानंतर काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "राहुल गांधींना आसाममधील शंकरदेव मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे होते. आम्ही ११ जानेवारीपासून मंदिरात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे दोन आमदारही मंदिर व्यवस्थापन समितीला भेटले. तसेच आम्ही २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता मंदिरात येऊ असे सांगितले. त्यावेळी त्यांनी आम्हाला परवानगी दिली. परंतु, रविवारी त्यांनी अचानक ३ वाजेपर्यंत मंदिरात येऊ शकत नाही, असे सांगितले. हा सरकारचा दबाव आहे. "
संबंधित बातम्या