EC On Rahul Gandhi : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना प्रचार सभेत जाहीर भाषण करतांना सांभाळून व्यक्तव्य करण्याचा सल्ला दिला आहे. आयोगाचे म्हटले आहे की त्यांनी बोलतांना आणि सार्वजनिक वक्तव्य करतांना अधिक सावध राहावे. दिल्ली उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केलेल्या भाषणाबद्दल यापूर्वी निवडणूक आयोगाला योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांवर हल्लाबोल करताना खीसेकापु आणि पनोती संबोधले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या या उपहासात्मक टिकेबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही बजावली होती.
निवडणूक आयोगाने यावर्षी १ मार्चच्या राहुल गंडी यांना या बाबत सूचना केल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी या सुचनांचे गांभीर्याने पालन करावे असे सांगितले. राहुल गांधी हे काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, एका सूत्राने सांगितले की, “दिल्ली उच्च न्यायालयाच्या २१ डिसेंबर २०२३ च्या आदेशासह पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या काही व्यक्तव्याशी संबंधित सर्व तथ्ये आणि राहुल गांधींच्या उत्तराचा विचार केल्यानंतर, भारतीय निवडणूक आयोगाने राहुल गंडी यांना हा सल्ला दिला आहे. भविष्यात व्यक्तव्य करतांना त्यांनी अधिक सावध आणि सतर्क राहायला हवे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने सर्व पक्ष, स्टार प्रचारक आणि उमेदवारांना राहुल गांधींना जाहीर वक्तव्य करताना आयोगाचा सल्ला लक्षात ठेवण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात सर्व राजकीय पक्षांना सार्वजनिक प्रचारात सभ्यता आणि अत्यंत संयम राखण्यासाठी आणि निवडणूक प्रचाराची पातळी वाढवण्यासाठी खास सूचनांची यादी जारी केली होती. सूत्रांनी सांगितले की, निवडणूक आयोग आगामी निवडणुकांमध्ये वेळ आणि सामग्रीच्या संदर्भात दिलेल्या नोटिसांची अमलबजावणी करत असताना योग्य आधार म्हणून सल्ल्यानुसार कोणत्याही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणूक आयोगांच्या सुचनांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात देशभरात मतदान होणार असल्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग काही दिवसांत तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्ष इंडिया अलायन्स यांच्यात मुख्य लढत होणार आहे. भाजपचा दावा आहे की यावेळी त्यांचा पक्ष ३७० जागा आणि एनडीए ४०० जागा जिंकणार आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीने आपल्या विजयाचा दावा केला आहे. गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत एकूण सात टप्प्यांत मतदान झाले आणि २३ मे रोजी निकाल जाहीर झाला