…तर नरेंद्र मोदी वाराणसीतून ३ लाख मतांंनी निवडणूक हरले असते, असं का म्हणाले राहुल गांधी?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  …तर नरेंद्र मोदी वाराणसीतून ३ लाख मतांंनी निवडणूक हरले असते, असं का म्हणाले राहुल गांधी?

…तर नरेंद्र मोदी वाराणसीतून ३ लाख मतांंनी निवडणूक हरले असते, असं का म्हणाले राहुल गांधी?

Updated Jun 11, 2024 07:58 PM IST

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कसाबसा विजय मिळाला आहे. माझी बहिण प्रियंका जर वाराणसीतून मोदींविरुद्ध लढली असती तर भारताचे पंतप्रधान किमान दोन ते तीन लाख मतांनी पराभूत झाले असते, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

नरेंद्र मोदी वाराणसीतून ३ लाख मतांंनी निवडणूक हरले असते: राहुल गांधी
नरेंद्र मोदी वाराणसीतून ३ लाख मतांंनी निवडणूक हरले असते: राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या निकालातून उत्तर प्रदेशसह देशाच्या जनतेनं पंतप्रधानांना एक संदेश दिला आहे. आम्हाला तुमचं द्वेषाचं, हिसेचं राजकारण आवडत नसल्याचा संदेश यात आहे. रायबरेची आणि अमेठीच्या जनतेनं माझ्यावर जो विश्वास दर्शवला तो मी आयुष्यभर विसरणार नाही. वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कसाबसा विजय मिळवला. माझी बहिणी प्रियंका जर वाराणसीतून निवडणूक लढली असती तर भारताचे पंतप्रधान किमान दोन ते तीन लाख मतांनी पराभूत झाले असते, असा टोला राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. जे-जे रायबरेलीच्या विकासासाठी मी करेन ते सर्व अमेठीत सुद्धा होईल, असं आश्वासन राहुल यांनी मतदारांना दिलं. रायबरेलीतून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर येथील मतदारांचे आभार मानण्यासाठी राहुल गांधी आज येथे आले होते. यावेळी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, अमेठीचे कॉंग्रेस खासदार के एल शर्मा उपस्थित होते.

राम मंदिर उदघाटनाला गरिबांना बोलावलं नसल्याने पराभव

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सच्च्या एकदिलाने एकत्रित येऊन निवडणुकीत काम केल्याचं राहुल गांधी म्हणाले. हेच चित्र राजस्थान, तमिळनाडूसह संपूर्ण देशात होतं. मला वाटलं हे असं का होतय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे भारताची घटना बदलण्याचा प्रयत्न करणार होते. आणि म्हणून संपूर्ण देश एकजुटीने त्याविरुद्ध उभा राहिला आहे. २०१४ नंतर पंतप्रधान राजरोसपणे हिंसा आणि द्वेषाचं राजकारण करत आहे. परंतु भारताची संस्कृती आणि धर्म हिंसा आणि द्वेषाविरुद्ध आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने द्वेष, हिंसा आणि अहंकाराविरुद्ध मतदान केल्याचं राहुल गांधी म्हणाले. भाजप लोकांमध्ये द्वेष पसरवते आणि आर्थिक लाभ दोन-तीन उद्योगपतींना करून देते, असा आरोप त्यांनी केला. अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी एकाही गरिबाला, शेतकऱ्याला, दलित, मागासवर्गिय व्यक्तीला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं, म्हणूनच अयोध्येतही भाजपचा पराभव झाल्याचे राहुल गांधी म्हणाले.

रायबरेलीशी गांधी घराण्याचं १०० वर्ष जुनं नातं

रायबरेलीच्या लोकांचं आणि गांधी घराण्याचं नातं १०० वर्ष जुन असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली. रायबरेलीच्या शेतकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता, तेव्हा जवाहरलाल नेहरु धावून आले होते. यांनी केलेल्या आंदोलनातून हे नातं तयार झालं, असं राहुल म्हणाले.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर