मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म तर...; राहुल गांधींचा पंतप्रधानांच्या जातीवरून निशाणा

Rahul Gandhi : मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म तर...; राहुल गांधींचा पंतप्रधानांच्या जातीवरून निशाणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 08, 2024 03:30 PM IST

Rahul Gandhi On Modi : भाजपचे लोक मोदी ओबीसीत जन्मले असं सांगून लोकांची दिशाभूल करत असल्याचा दावा राहुल गांधींनी केला.

Rahul Gandhi On Modi
Rahul Gandhi On Modi

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ओडिशा राज्यातील झारसुगुडा येथे पंत प्रधान नरेंद्र मोदीयांच्या जातीवरून (PM Narnedra Modi Caste) निशाणा साधला. राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी अन्य मागास वर्ग (ओबीसी) समुदायाशी (PM Modi Not Born As OBC) संबंधित नाहीत. राहुल गांधींनी सांगितले की, पंतप्रधान मोदींचा जन्म सामान्य जातीत झाला आहे.

ओडिशातील भारत जोडो न्याय यात्रेतकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी मोदींच्या ओबीसी जातीच्या विधानावर आक्षेप घेतला. मोदी ओबीसी जातीत जन्मला आले नाहीत तर ते जनरल कॅटेगिरीत जन्मले आहेत.मात्र भाजपचे लोक मोदी ओबीसीत जन्मले असं सांगून लोकांची दिशाभूल करत असल्याचा दावा राहुल गांधींनी केला.

राहुल गांधी म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांकडून मोदींच्या जातीवरून लोकांना फसवलं जात आहे. नरेंद्र मोदी ओबीसीत जन्माला आले नाहीत. ते तेली समाजाचे आहेत. भाजपने सन २००० मध्ये त्यांच्या जातीला ओबीसी बनवलं. ते जनरल कॅटेगिरीतच जन्मले. मोदी ओबीसीत जन्मले हे जगाला खोटं सांगत आहेत. ते ओबीसी नाहीत हे मला माहिती आहे. ते कुठल्याही ओबीसीची गळाभेट घेत नाहीत. ते जातगणना करत नाहीत कारण ते ओबीसी नाहीत. कोट्यवधीचा सूट घालतात आणि स्वत:ला गरीब, फकीर सांगतात. रोज सकाळ, संध्याकाळ नवा ड्रेस घालून स्वत:ला ओबीसी बोलत असल्याची टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली.

राहुल म्हणाले की, यासाठी मला जन्म प्रमाणपत्राची गरज नाही कारण मला ते माहिती आहे. मोदी कुठल्याही शेतकरी, कामगाराचा हात पकडत नाहीत. केवळ अदानींचा हात पकडतात. त्यामुळे ते पूर्ण आयुष्यात जातीनिहाय जनगणना करणार नाहीत. जातनिहाय जनगणना केवळ काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींच करून दाखवतील असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.

WhatsApp channel