मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi: ‘अधिकारांसाठी लढा देण्याची जबाबदारी, संविधानावर आक्रमण झाल्यास..’, विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गॅरंटी

Rahul Gandhi: ‘अधिकारांसाठी लढा देण्याची जबाबदारी, संविधानावर आक्रमण झाल्यास..’, विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गॅरंटी

Jun 26, 2024 09:37 PM IST

RahulGandhi : विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर जनतेचा आवाज बनूनतुमच्या हितांसाठी तसेच अधिकारांसाठी लढाई लढण्याची जबाबदारी आहे., अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.

राहुल गांधींनी सांगितलं विरोधी पक्षनेतेपदाचे महत्व
राहुल गांधींनी सांगितलं विरोधी पक्षनेतेपदाचे महत्व

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा विरोधी पक्षनेता बनवण्यात आले आहे. १० वर्षानंतर कोणालाह तरी हे पद मिळाले आहे. LoP बनवल्यानंतर राहुल गांधी यांनी आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत इंडिया आघाडीचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर या पदाची महत्व व जबाबदारी स्पष्ट केली आहे. राहुल गांधींनी म्हटले आहे की, देशातील जनता, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि INDIA आघाडीतील सहयोगी पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. 

विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर जनतेचा आवाज बनूनतुमच्या हितांसाठी तसेच अधिकारांसाठी लढाई लढण्याची जबाबदारी आहे. आपले संविधान गरीब, वंचित,अल्पसंख्यक, शेतकरी व मजुरांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. आणि आम्ही त्यावर झालेल्या आक्रमणाला पूर्ण ताकदीनिशी परतवून लावूमी तुमचाच आहे व तुमच्यासाठीच आहे.

ट्रेंडिंग न्यूज

१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला २४ जून पासून सुरुवात झाली असून पहिल्या दोन दिवस नवनियुक्त खासदारांना शपथ देण्यात आली. यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याचा निर्णय झाला. लोकसभा सभागृहाने त्याला मान्यता दिली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करत, सर्वांचे आभार मानत जनतेला आश्वस्त केले आहे.

एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशातील जनतेला, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो. मला कुणीतरी विचारले की, माझ्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा अर्थ काय होतो? त्यावर मी सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणजे तुमचा आवाज आहे. तुमच्या मनात ज्या काही भावना आहेत, तुमचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या विरोधी पक्षनेते पदाच्या माध्यमातून लोकसभेत मांडेन. देशातील गरीब, दलित, आदिवासी, मागासवर्ग, अल्पसंख्यक,  शेतकरी,  कामगार सर्वांसाठी संविधान मोठी शस्त्र आहे, त्याचे रक्षण केले जाईल.

संविधानामुळे सर्व घटकांचे संरक्षण होते.जेव्हा जेव्हा सरकार संविधानावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल किंवा संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करेल, तिथे तिथे पूर्ण ताकदीने संविधानाचे आम्ही रक्षण करू. मी तुमचा आहे आणि तुमचा आवाज संसदेत उठवणार, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर