Bharat Jodo Yatra Madhya Pradesh : कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात दाखल झाली आहे. यावेळी राहुल गांधींनी पदयात्रेचा रुट बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मगाव असलेल्या महुमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी 'मी पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात लढतो, परंतु त्यांच्याविषयी मनात कोणताही द्वेष नसल्याचं सांगितलं. आज्जीला ३२ गोळ्या घातल्या अन् वडिलांना बॉम्बनं उडवलं, तरीही माझ्या मनात कोणतीही भीती किंवा द्वेष नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.