Rahul Gandhi on Jagdeep Dhankhar : काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या मिमिक्रीचा व्हिडिओ बनवल्याच्या वादावर मौन सोडले आहे. राहुल म्हणाले की, मिमिक्रीचे कारणही सांगितले आहे. खासदार संसदेच्या बाहेर बसले होते. मी त्यांचा व्हिडिओ शूट केला. माझा व्हिडिओ माझ्या फोनमध्ये आहे. मीडिया हा व्हिडिओ वारंवार दाखवत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, आमच्या १५० खासदारांना संसदेतून निलंबित केले, कोणी काहीच बोलले नाही. मीडियामध्ये याची साधी चर्चाही नाही. अदानींवर कोणती चर्चा नाही, राफेलवर चर्चा नाही, बेरोजगारीवर चर्चा नाही. आमचे खासदार निरोश होऊन संसदेच्या पायऱ्यांवर बसले आहे. मात्र तुम्ही मिमिक्रीवर खूप चर्चा करत आहात.
संसदेत गोंधळ घालण्याच्या आरोपात लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षांचे आतापर्यंत १४३ खासदार निलंबित करण्यात आले आहेत. निलंबित खासदारांनी आरोप केला की, आम्ही संसदेच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींवर पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन द्यावे, ही मागणी केली आहे. दोन्ही नेत्यांनी या मुदद्यावर का मौन धरले आहे. ते या मुद्द्यावर निवेदन देण्याऐवजी विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करण्याच्या कामाला लागले आहेत.
संसदेतील गदारोळ व खासदारांचे केलेले निलंबन या मुद्द्यावर इंडिया आघाडीकडून २२ डिसेंबर रोजी देशव्यापी निर्देशने करण्यात येणार आहेत. आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अलायन्सच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरून आपला विरोध जाहीर करतील. तसेच खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करतील.
संबंधित बातम्या