मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi On Gujarat: अयोध्येत जसा भाजपचा पराभव झाला, तसाच गुजरातमध्ये करू, मोदींच्या होमपीचवर राहुल गांधींचे आव्हान

Rahul Gandhi On Gujarat: अयोध्येत जसा भाजपचा पराभव झाला, तसाच गुजरातमध्ये करू, मोदींच्या होमपीचवर राहुल गांधींचे आव्हान

Jul 06, 2024 05:49 PM IST

Rahul Gandhi on Gujarat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देवाशी थेट संबंध आहे, मग लोकसभा निवडणुकीत अयोध्येत भाजपचा पराभव का झाला, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना राहुल गांधी (Sakib Ali/Hindustan Times)
माध्यमांशी बोलताना राहुल गांधी (Sakib Ali/Hindustan Times)

अयोध्येत जसा भाजपचा पराभव झाला तसाच पराभव गुजरातमध्येही होणार आहे, हे मी लिहून देतो. पंतप्रधान मोदी अयोध्येतून लढले असते तर ते सुद्धा पराभूत झाले असते. वाराणसीतून कसे बसे जिंकले आहेत. त्यांचा विजय केवळ १ लाख मतांनी झाला आहे. आता अयोध्येप्रमाणेच भाजपचा गुजरातमध्येही पराभव होणार, असे भाकित लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांनी शनिवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर हल्ला चढवला आणि लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये अयोध्येत जसे भाजपला पराभूत केले, तसेच गुजरात निवडणुकीतही भाजपला पराभूत करु.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देवाशी थेट संबंध आहे, मग लोकसभा निवडणुकीत अयोध्येत भाजपचा पराभव का झाला, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपने आम्हाला धमकावून आणि आमच्या कार्यालयाचे नुकसान करून आव्हान दिले आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही एकत्र येऊन त्यांचे सरकार तोडणार आहोत जसे त्यांनी आमच्या कार्यालयाचे नुकसान केले. काँग्रेस गुजरातमध्ये निवडणूक लढवेल आणि अयोध्येप्रमाणे गुजरातमध्येही नरेंद्र मोदी आणि भाजपला पराभूत करेल, असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस गुजरातमध्ये जिंकेल आणि राज्यातून नवी सुरुवात करेल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपचे युवा आघाडीचे सदस्य तेथे आले असता २ जुलै रोजी अहमदाबादमधील पालडी भागातील काँग्रेसचे प्रदेश मुख्यालय राजीव गांधी भवनाबाहेर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली, ज्यात सहाय्यक पोलिस आयुक्तांसह पाच पोलिस जखमी झाले.

त्यामुळे अयोध्येची जनता संतापली -

राहुल गांधी यांनी अयोध्येतील फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पराभवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी एकाही स्थानिक व्यक्तीला निमंत्रित करण्यात आले नसल्याचे पाहून अयोध्येतील जनतेला संताप आला. पंतप्रधान मोदींना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण त्यांचा पराभव होईल आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, असे सांगून त्यांच्या सर्वेक्षकांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधी एक दिवसाच्या दौऱ्यावर येण्यापूर्वीच गुजरातमधील अहमदाबाद येथे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी त्यांना वासना पोलिस ठाण्यात भेटणार होते, मात्र पोलिस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना सकाळी मुख्य न्यायदंडाधिकारी बी. जी. राठोड यांच्या न्यायालयात हजर केले.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर