काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील काही दिवसात चार वेळा आपल्या भाषणात बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि त्यांची अभिनेत्री सून ऐश्वर्या राय बच्चन यांचा उल्लेख केला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की. अयोध्येत अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना बोलावले मात्र गरीबांना आमंत्रित केले नाही. राहुल गांधींनी आठवड्यात राम मंदिरावरून ऐश्वर्या रायचा चार वेळा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय रामलल्ला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अयोध्येत गेलीही नव्हती. तरीही तिचे नाव घेऊन नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधणाऱ्या राहुल गांधी यांना ट्रोल केले जात आहे.
भारत जोडो यात्रा करत असलेले राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हटले की, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात अब्जाधीशांना बोलावले, मात्र देशातील आदिवासी, गरीब आणि मागास वर्गाला दूर ठेवले गेले. राहुल गांधी म्हणाले की, याआयोजनातून देशाच्या राष्ट्रपतींनाही दूर ठेवले गेले. राहुल गांधी म्हणाले की, उद्योगपती व अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करून मोदी सरकारने हा संकेत दिला आहे की, देशाचील ७३ टक्के लोकसंख्येचे त्यांच्या दृष्टीने काहीच महत्व नाही.
इतकेच नाही तर रॅलीमध्ये राहुल गांधी म्हणाले की, मीडियामध्ये तुमची आवाज ऐकू येत नाही. मीडिया संपूर्ण दिवसभर नरेंद्र मोदींना दाखवते. कधी-कधी ऐश्वर्या राय नाचताना दिसेल. दुसरीकडे अमिताभ बच्चन बल्ले-बल्ले करत निघून जाताना दिसेल. त्यांच्या या टिप्पणीवरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. त्याचबरोबर विचारले जात आहे की, ऐश्वर्या राय अयोध्येला गेली नसताना राहुल गांधी वारंवार तिचे नाव घेऊन मोदीवर का हल्लाबोल करत आहेत.