काँग्रेस नेते राहुल गांधी वेळोवेळी सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्याची संवाद साधतात. आज राहुल गांधी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशनवर जाऊन हमालांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी कुलींची ओळख असलेला लाल रंगाची शर्ट परिधान करून सूटकेस डोक्यावर ठेऊन चालताना दिसून आले. राहुल गांधींनी हमालांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
हमालांशी संवाद साधतानाचे फोटो राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, "खूप काळापासून माझ्या मनात हमालांना भेटण्याची इच्छा होती. त्यांनीही मला मोठ्या प्रमाणे बोलावले होते. भारताच्या मेहनती बांधवांची इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच होती. "
त्याचबरोबर यूथ काँग्रेसनेही ट्वीट करत म्हटले आहे की, "सर्व दुनियेचे ओझे आपल्या डोक्यावर उचलणाऱ्या लोकांच्या मनातील ओझे हलके करण्यासाठी राहुल गांधी आनंद विहार रेल्वे स्टेशन पोहोचले"
फोटोंमध्ये राहुल गांधी हमालांची ओळख असलेला लाल रंगाचा शर्ट परिधान करून डोक्यावरून सामान वाहताना दिसले. राहुल गांधींनी हमालांच्या सोबत बसून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी हमालांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांनी राहुल सोबत सेल्फीही घेतली.
हमालांनी राहुल गांधींच्या दंडावर कुलीचा बिल्ला बांधला. त्यावर ७५६ नंबर होता. म्हणजे राहुल आज ७५६ नंबरचे हमाल बनले.