Rahul Gandhi viral video : भारत जोडो न्याय यात्रेतील राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवरुन भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेदरम्यान कुत्र्याला बिस्कीट खाऊ घालतांना दिसत आहे. त्या कुत्र्याने बिस्कीटाचा वास घेतला पण ते खाल्लं नाही. दरम्यान, याच वेळी अनेक कार्यकर्ते राहुल गांधी यांना भेटायला येतात. यावेळी त्यांच्यातील एकाशी हात मिळवत कुत्र्याने हुंगलेले आणि न खाल्लेले बिस्किट ते काँग्रेस कार्यकर्त्याच्या हातावर ठेवतांना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो असून यामुळे राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे.
या व्हिडिओ वरुन भाजपने राहुल गांधी यांना घेरले आहे. भाजपने म्हटले आहे की, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल यांनी कुत्र्याने न खाल्लेली बिस्किटं ही कार्यकर्त्याला दिली. भाजपचे मदन मोहन मालविय यांनी हा व्हिडिओ ट्विट देखील केला आहे. यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील कार्यकर्त्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप भाजपंचे केला होता.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, 'काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे जी यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यांशी केली होती आणि इथे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात एका कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत आहेत आणि कुत्र्याने न खाल्लेली बिस्किटे ही त्यांच्या कार्यकर्त्याला खायला दिली.
त्यांनी पुढे लिहिले की, ‘एखाद्या पक्षाचा अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांना कुत्र्यासारखे वागवत असतील, तर अशा पक्षाचे अस्तित्व नाहीसे होणे स्वाभाविक आहे.’
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा व्हिडिओ जारी केला आहे. खरगे यांच्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आचार्य म्हणाले, 'कार्यकर्ता हा कुत्रा नसतो, तो मेहनती आणि धाडसी माणूस असतो. माननीय महोदय, ही नक्कीच कटू गोष्ट आहे पण सत्य आहे.' त्यांनी पोस्टमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनाही टॅग केले आहे.