मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi: ‘भारत जोडो’ दरम्यान मी दहशतवाद्यांना पाहिले अन् त्यांनी मला; पण.., राहुल गांधींचा दावा

Rahul Gandhi: ‘भारत जोडो’ दरम्यान मी दहशतवाद्यांना पाहिले अन् त्यांनी मला; पण.., राहुल गांधींचा दावा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2023 03:51 PM IST

RahulGandhi on terrorist: राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये आल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांना पाहिले होते. तसेच ते त्यांच्याशी बोललेही होते.

Rahul Gandhi on terrorist 
Rahul Gandhi on terrorist 

केंब्रिज  विद्यापीठात आपल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी करण्यासंबंधी सारखे अनेक दावे केले आहेत. त्यापैकी एक दावा हा आहे की, भारत जोडो यात्रेच्या दरम्यान जम्मू कश्मीरमध्ये मी दहशतवाद्यांना पाहिले होते व त्यांनी माझ्यांशी नजर मिळवली होती. राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीर यात्रेदरम्यान दहशतवादी मला पाहत होते, मात्र त्यांनी मला काही केले नाही. हीच ताकद आहे ऐकून घेण्याची. सुरक्षा दलांनी आम्हाला सल्ला दिला होता की, आम्ही काश्मीमधून यात्रा काढू नये कारण येथे दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, त्यानंतर मी लोकांशी बोललो त्यांनी म्हटले की, आम्हाला यात्रा काढावी लागेल. त्यानंतर आम्ही काश्मीरमधून भारत जोडो यात्रा काढली. त्या दरम्यान एक अज्ञात व्यक्त माझ्या जवळ आला. त्यांनी मला म्हटले की, त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. राहुल गांधींनी म्हटलं की, त्या व्यक्तीने मला विचारले की, काँग्रेस नेते येथे आम्हा लोकांचे म्हणणे ऐकण्यासाठी आले आहेत. दरम्यान त्या व्यक्तीने काही लोकांना संकेत दिले, जे जवळच उभे होते. त्यांनी म्हटले की, ते सर्व दहशतवादी आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, त्यावेळी मला वाटले की, कदाचित आम्हा संकटात आहोत. दहशतवादी मला मारू शकतात. मात्र त्या लोकांनी मला काही केले नाही, कारण ही ऐकण्याची ताकद आहे. मंगळवारपासून राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात एका कार्यक्रमला संबोधित केले. त्यांनी म्हटले की, आज जगातील लोकशाहीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक आहे की, सर्वांची म्हणणे ऐकून घेतला पाहिजे. त्याचवेळी राहुल गांधी म्हणाले की, भारतातील लोकशाही व संविधान धोक्यात आहे. सरकार विरोधकांची हेरगिरी करण्यासाठी  पेगाससचा वापर करत आहे. लोकशाहीवर आघात होत आहेत. 

WhatsApp channel