Rahul Gandhi Flying Kiss In Lok Sabha: काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राहुल गांधींनी बुधवारी (०९ ऑगस्ट २०२३) संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान भाजप खासदारांना फ्लाइंग किस दिले, असा आरोप करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या या प्रतिक्रियेवर अनेक महिला खासदारांच्यावतीने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली. त्याचबरोबर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी याला असभ्यतेचे वर्तन म्हटले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी खासदारपदी बहाल झाल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत भाषण केले. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आली असून ज्यांनी हे केले ते देशद्रोही आहेत, अशा अनेक मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर शाब्दीक हल्ला चढवला. मात्र, भाषण संपल्यानंतर राहुल गांधींनी भाजपच्या महिला खासदारांना प्लाइंग किस दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. महिला खासदारांनी सभापतींकडे तक्रार केली. तर, स्मृती इराणी यांनी याला असभ्यतेचे वर्तन म्हटले आहे.
राहुल गांधी अविश्वास प्रस्तावाच्या भाषणानंतर संसदेच्या आवारातून बाहेर पडत असताना त्यांच्या काही फाईल्स खाली पडल्या. याच फाईल्स उचलण्यासाठी ते खाली वाकताच भाजपचे काही खासदार त्यांच्यावर हसायला लागले. यावेळी राहुल गांधींनी भाजप खासदारांना फ्लाइंग किस दिले आणि हसत बाहेर पडले, असा आरोप केला जात आहे.
राहुलच्या फ्लाइंग किसवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. संसदेतील भाषणादरम्यान स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आणि म्हणाल्या की, संसदेत महिला खासदारांना विरोधी पक्षातील केवळ एक महिलाच फ्लाइंग किस देऊ शकते. यापूर्वी असे कधी घडले नाही. यावरून राहुल गांधी स्त्रियांबद्दल काय विचार करतात हे दिसून येते. ही असभ्यता आहे, असेही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या