मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : अजगराने शेळी गिळली, गावकऱ्यांनी दोरीने बांधून बाहेर काढली, मग काय झाले? पाहा VIDEO

Viral news : अजगराने शेळी गिळली, गावकऱ्यांनी दोरीने बांधून बाहेर काढली, मग काय झाले? पाहा VIDEO

Aug 08, 2023 02:57 PM IST

python swallowed goat Viral Video : मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी अजगराने बकरी गिळली. यानंतर गावकऱ्यांनी अजगराला पकडून दोरीने बांधून तोंडातून बकरी बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

python swallowed goat
python swallowed goat

Viral Video python swallowed goat : मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी एका अजगराने मोठी बकरी गिळली. ही बाब गावकऱ्यांना समजताच गावात एकच गोंधळ उडाला. अजगराला पाहण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडाली होती. गावकऱ्यांनी अजगराला घेराव घालून अजगराला पकडले. त्यानंतर त्याला दोरीने बांधून तोंडातून बकरी बाहेर काढली. यादरम्यान अजगराचा मृत्यू झाला. वनविभागाच्या कारवाईने घाबरलेल्या गावकऱ्यांनी अजगराला दोरीने बांधून दुचाकीवरून फरफट नेले आणि नंतर जाळून टाकले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आगर माळव्यातील सुसनेर तालुक्यातील सिरपोई गावातील लोकांचे म्हणणे आहे की, रविवारी संध्याकाळी अजगराने शेळी गिळली. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी अजगर शेळीला पकडल्याची तक्रार वनविभागाकडे केली, मात्र वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले नाही. यामुळे गावकऱ्यांनीच शेळीची सुटका केली. यादरम्यान अजगराचा मृत्यू झाला.

अजगराच्या मृत्यूने घाबरलेल्या गावकऱ्यांनी त्याला दोरीने बांधून दुचाकीवरून फरफट नेले आणि तेथेच त्यांनी मृत अजगराला जाळल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची माहिती वनविभागापर्यंत पोहोचली, त्यानंतर सोमवारी सायंकाळी वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या वनविभागाच्या पथकाने कोणतीही कारवाई केलेली नाही. अधिका-यांनी सांगितले की, ते घटनेची माहिती गोळा करत आहेत. लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल.

WhatsApp channel