Viral News: सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दुरुस्तीच्या कामासाठी गॅरेजमध्ये आलेल्या एका एसयूव्ही कारच्या बोनेटमध्ये मेकॅनिकला असे काही दिसले की, त्याच्यासह आजूबाजुचे लोकही आश्चर्यचकीत झाले. या कारच्या बोनेटमध्ये मॅकेनिकला चक्क सात फुटाचा अजगर दिसला. यानंतर सर्पमित्राला बोलवून या अजगराला जंगलात सोडण्यात आल्याची माहिती आहे.
डीएनए रिपोर्टनुसार, सिव्हिल लाइन्स परिसरातील हॉटेल अजय इंटरनॅशनलजवळील एका गॅरेजमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही दुरुस्तीच्या कामासाठी गॅरेजमध्ये आली. या कारची तपासणी करण्यासाठी मेकॅनिकने कारचे बोनेट उघडले असता कारच्या बॅटरीजवळ त्याला भलामोठा अजगर दिसला. त्यानंतर मेकॅनिकने मालकाला माहिती दिल्यानंतर आपत्कालीन सेवा आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. बचावकार्यासाठी दोन अधिकारी आले होते. घटनास्थळी उपस्थित असेलल्या लोकांनी बचावकार्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला.
चंद्रपूरमधील लोहारा गावातील एका हॉटेलमध्ये ८ फूट लांबीचा अजगर आढळला. या अजगराची सुटका करून काही तासांतच लोहारा जंगलात सोडण्यात आल्याची माहिती आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
अजगर हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. भारतात पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर आढळतात, ज्याला रॉक पायथॉन असेही म्हणतात. हे अजगर घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवर देखील वावरतात.
भारतात अजगर पाळणे, मारणे अथवा त्याचे कातडे जवळ बाळगणे यावर कायद्याने बंदी आहे. काही आदिवासी खाण्यासाठी अजगराची शिकार करतात. काही वेळा भीतीपोटीही ते अजगर मारले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातड्याला मोठी मागणी असते. अजगराच्या कातड्यापासून पर्स, पट्टे वगैरे तयार केले जातात. यासाठी काही लोक अजगराची शिकार करतात. अजगरांची शिकार वाढल्यामुळे अनेक भागांतील अजगर कमी झाले आहेत.