मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jagannath Temple: जगन्नाथ मंदिरात ड्रेस कोड लागू; स्कर्ट, स्लिव्हलेस टॉप, जीन्स घालण्यास बंदी!

Jagannath Temple: जगन्नाथ मंदिरात ड्रेस कोड लागू; स्कर्ट, स्लिव्हलेस टॉप, जीन्स घालण्यास बंदी!

Jan 01, 2024 08:30 PM IST

Jagannath Temple Dress Code: ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आले आहेत.

Jagannath Temple
Jagannath Temple

Jagannath Temple Updates: नवीन वर्षाच्या निमित्ताने ओडिशाच्या पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. दरम्यान, मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी ड्रेस कोड जारी केला. याशिवाय, या मंदिराच्या आवारात गुटखा, पानसह प्लास्टिक आणि पॉलिथिनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन म्हणजेच एसजेटीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना नीटनेटके कपडे घालावे लागतील. हाफ पँट, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि सिव्हलेस ड्रेस घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.” याशिवाय, मंदिर परिसरात गुटखा आणि पानावर बंदी लागू करण्यात आली. पोलिसांनाही बंदीची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडही आकारला जाईल.

नियम लागू झाल्यामुळे वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणारे पुरुष धोतर आणि महिला साडी किंवा सलवार कमीज घातलेल्या दिसल्या. पहिल्याच दिवशी भगवंताच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. दरम्यान, सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत १ लाख ८० हजार भाविकांनी श्री जगन्नाथचे धामचे दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला नाही. अपंग भाविकांसाठी पोलीस प्रशासनाकडूनही विशेष सोय करण्यात आली, अशी माहिती पुरी पोलिसांनी दिली.

सोमवारी सकाळपासूनच भाविकांसाठी मंदिराबाहेर एसी कॅम्प सुरू करण्यात आला, जिथे भाविकांसाठी बसण्याची सोय केली जाणार आहे. याठिकाणी पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर परिसरात ठिकठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत.

WhatsApp channel
विभाग