१८ महिन्यात ११ जणांची निर्घृण हत्या, 'त्या' सिरियल किलरला पकडण्यात यश, 'या' लोकांना करायचा टार्गेट!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  १८ महिन्यात ११ जणांची निर्घृण हत्या, 'त्या' सिरियल किलरला पकडण्यात यश, 'या' लोकांना करायचा टार्गेट!

१८ महिन्यात ११ जणांची निर्घृण हत्या, 'त्या' सिरियल किलरला पकडण्यात यश, 'या' लोकांना करायचा टार्गेट!

Dec 25, 2024 03:04 PM IST

Punjab Serial Killer News: १८ महिन्यांत ११ जणांची हत्या करणाऱ्या सीरिअल किलरला पकडण्यात पंजाब पोलिसांनी यश आले आहे.

१८ महिन्यात ११ जणांची निर्घृण हत्या, 'त्या' सिरियल किलरला पकडण्यात यश
१८ महिन्यात ११ जणांची निर्घृण हत्या, 'त्या' सिरियल किलरला पकडण्यात यश

Punjab Serial Killer Arrested: पंजाबमध्ये एका सीरियल किलरला झालेली अटक आणि त्यानंतर झालेल्या खुलाशांमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने अवघ्या १८ महिन्यांत ११ जणांची हत्या केल्याची चौकशीत उघड झाले. राम सरूप ऊर्फ सोढी असे या तरुणाचे नाव असून तो होशियारपूर जिल्ह्यातील चौरा गावचा रहिवासी आहे. राम सरूप याला सोमवारी पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली. त्यावेळी चौकशीदरम्यान त्याने असे काही सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या पाया खालची जमीन सरकली. आरोपीने गेल्या १८ महिन्यात ११ जणांची हत्या केल्याची कबूली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गळा आवळून आणि दगडाने ठेवून लोकांची हत्या केली. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी अनेकदा लोकांना आपल्या कारने लिफ्ट देऊन त्यांना लुटायचा. प्रतिकार करणाऱ्यांना आणि पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना तो ठार करायचा.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लोकांची हत्या केल्यानंतर एक निशाणी सोडायचा. त्याने एका व्यक्तीची हत्या करून त्याच्या पाठीवर देशद्रोह असे लिहिले होते. मृत व्यक्ती माजी सैनिक असून एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. एसपी नवनीत सिंह महल यांनी सांगितले की, आरोपी विवाहित होता आणि त्याला तीन मुले आहेत. मात्र, दोन वर्षापूर्वी काही कारणास्तव त्याची पत्नी त्याला सोडून गेली, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

राम सरूपला यापूर्वी कीर्तारपूर साहिब येथील एका खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्याने इतर १० जणांची हत्या केल्याची कबुली दिली. गेल्या १८ महिन्यांत रूपनगर, फतेहगढ साहिब आणि होशियारपूरमधील लोकांना त्याने लक्ष्य केले आहे. आतापर्यंत पाच प्रकरणांची पुष्टी झाली आहे. पोलिस इतर प्रकरणांचा तपास करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर