पत्नी व्यभिचारी असली, तिचे विवाहबाह्य संबंध असले तरी…; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पत्नी व्यभिचारी असली, तिचे विवाहबाह्य संबंध असले तरी…; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

पत्नी व्यभिचारी असली, तिचे विवाहबाह्य संबंध असले तरी…; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Updated Sep 19, 2024 03:12 PM IST

High Court News : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामध्ये पत्नीचे विवाहबाह्य संबंध असले तरी तिला मुलांची कस्टडी दिली जावी असा निकाल दिला आहे.

कौंटुंबिक प्रकरणात उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
कौंटुंबिक प्रकरणात उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Punjab-Haryana High Court Order: पंजाब-हरियाणा हायकोर्टाने महत्वपूर्ण निर्णय देताना म्हटले की, एखाद्या आईचे व्यभिचारी होणे अल्पवयीन मुलांचा ताबा देण्यात बाधा ठरत नाही. कारण तिचे विवाहबाह्य संबंध असूनही ती आपल्या मुलांना आईचे प्रेम देण्यास सक्षम असते. दोन अल्पवयीन मुलांची कस्टडी आईला देण्याचा आदेश देताना हायकोर्टाने हे प्रकरण कुटुंब न्यायालयाने नव्याने कस्टडीवर निर्णय घेण्यासाठी पाठवला आहे.

त्याचबरोबर हायकोर्टाने हरियाणा, पंजाब सरकार आणि चंडीगड प्रशासनाने सर्व मध्यस्थी केंद्रांवर एक नियमित बालमानसोपचार तज्ज्ञाची भरती करण्याचा आदेश दिला आहे. जेणेकरून अशा प्रकरणात त्यांचा सल्ला घेतला जाऊ शकतो. तसेच अल्पवयीन मुलांच्या हितामध्ये निर्णय घेण्यास कोर्टाला सोपे जाईल.

फॅमिली कोर्टाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान -

याप्रकरणात याचिका दाखल करताना महिलेने पिहोवा येथील फॅमिली कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते. फॅमिली कोर्टाने तिला ३ व ६ वर्षांच्या मुलांचा ताबा देण्यास नकार दिला होता. याचिकेत म्हटले होते की, दाम्पत्याला दोन मुले होती व पती-पत्नी २०१६ पासून विभक्त रहात होती. तेव्हापासून मुले त्यांच्या आजी-आजोबाकडे रहात आहेत. आईच्या वकिलांनी कोर्टात दावा केला की, मुलांचे आजी-आजोबा त्यांच्याशी गैरवर्तन करतात. त्यांची सांभाळ करण्याची पद्धत योग्य नाही. या आरोपाचे उत्तर देताना म्हटले गेले की, महिलेचे चारित्र्य योग्य नसून ती व्यभिचारी जीवन जगत आहे.

हायकोर्टाने महिलेच्या बाजुने दिला निकाल -

या याचिकेवर हायकोर्टाने निकाल देताना म्हटले की, पितृसत्तात्मक समाजात  एका महिलेच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित करणे सामान्य गोष्ट आहे. आपल्या समाजात हा आरोप अनेकदा बिनबुडाचे असतात. जरी मानले की, महिलेचे विवाहबाह्य संबंध आहेत, तरीही आम्ही असा निष्कर्ष काढू शकत नाही की, ती आपल्या मुलांसाठी चांगली आई बनू शकणार नाही.

कोर्टाने म्हटले की, वैवाहिक संबंधातून सहमतीने संबंध ठेवण्याच्या प्रकरणात व्यभिचाराची झलक दिसू शकते. विवाहबाह्य संबंध आईला आपल्या मुलांचा ताबा घेण्यापासून रोखू शकत नाही. कारण आपल्या मुलांवर आईसारखे प्रेम कोणी करू शकत नाही. हायकोर्टाने मुलांच्या आजी-आजोबांना आदेश दिला आहे की, फॅमिली कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत मुलांचा ताबा आईकडे सोपवावा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर