मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  १९ वर्षांच्या विद्यार्थीनीसोबत 'लिव-इन'मध्ये राहण्यासाठी शिक्षकाची कोर्टात धाव; पुढं काय झालं?

१९ वर्षांच्या विद्यार्थीनीसोबत 'लिव-इन'मध्ये राहण्यासाठी शिक्षकाची कोर्टात धाव; पुढं काय झालं?

Jan 14, 2024 05:47 PM IST

Punjab and haryana high court on live in relationship : १९ वर्षीय विद्यार्थीनी सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणासाठी एका गणिताच्या शिक्षकाने थेट कोर्टात धाव घेतली. मात्र, कोर्टाने त्याला फटकारले असून त्याला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

punjab and haryana high court on live in relationship
punjab and haryana high court on live in relationship

live in relationship with 19 year old student : एका शिक्षकाच्या त्याच्या १९ वर्षीय विद्यार्थीनीवर जीव जडला असून तिच्या सोबत लीव्ह ईंन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी त्याने थेट कोर्टात धाव घेतली आहे. हा शिक्षक विवाहित असून त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा देखील आहेत. दरम्यान, या शिक्षकाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते हे पवित्र असते. त्यामुळे असे संबंध ठेवले तर समाजात चुकीचा संदेश जाईल, असे म्हणत न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड शिक्षकाला ठोठावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Atal Setu Bridge : प्रवाशांना अटल सेतूची भुरळ! चिर्ले मार्गाने पनवेल आणि उरणच्या दिशेने वाहतूक सुरू

हे प्रकरण पंजाब मधील एका जिल्ह्यातील आहेत. एका विद्यालयातील शिक्षकाचे त्याच्या विद्यार्थिनीशी संबंध प्रस्थापित झाले. दोघांची एकमेकांवर जीव जडला. त्यांना एकत्र राहायचे आहे. मात्र, त्याच्या या नात्याला समाजाची मान्यता नाही. यामुळे त्यांच्या नात्याला संरक्षण मिळावे म्हणून दोघांनीही पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेत लीव्ह ईंन मध्ये राहण्यासाठी परवानगी मागितली. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्या नात्याला संरक्षण मिळावे याची देखील मागणी केली. त्यांनी दिलेल्या याचिकेत म्हटले की, आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम असून आम्हाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे. मात्र, मुलीचे कुटुंबिय विरोध करत आहेत.

Kolhapur News : शिवाजी महाराजांचे वंशज काँग्रेसच्या वाटेने! लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय होण्याची शक्यता

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आलोक जैन म्हणाले की, एका विवाहित शिक्षक जो एका मुलाचा पिता देखील आहे, त्याला आपल्याच १९ वर्षीय विद्यार्थ्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची इच्छा आहे, हे आश्चर्यकारक आहे. हे पवित्र नाते असून या नात्याला मान्य देणे चुकीचे ठरेल. अशा याचिकांबाबत कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, तरच समाजात योग्य संदेश जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलानेही या बाबत निर्णय देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावत उलट शिक्षकालाच दंड ठोठावला.

कलम २२६ अंतर्गत संरक्षण मिळावे यासाठी शिक्षक-विद्यार्थीनीच्या जोडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले की पहिल्या जोडीदारासोबत लग्न तुटलेले नसतांना दुसऱ्या जोडीदारासोबत राहणे हे आयपीसीच्या कलम ४९४, ४९५ अंतर्गत द्विपत्नीत्वाचा गुन्हा ठरू शकतो. या याचिकेची शहानिशा करून न्यायालयाने शिक्षकाला प्रतिबंधक म्हणून तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि ही रक्कम हायकोर्ट बार असोसिएशन वकील कुटुंब कल्याण निधीत जमा करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

WhatsApp channel
विभाग