मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पंजाबच्या तुरुंगात कैद्यांमध्ये गँगवॉर; गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील तीन आरोपी ठार

पंजाबच्या तुरुंगात कैद्यांमध्ये गँगवॉर; गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील तीन आरोपी ठार

Feb 26, 2023 07:47 PM IST

Punjab goindwal sahib jail gangwar : पंजाबीगायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतील तीन आरोपींची गोइंदवाल तुरुंगात हत्या करण्यात आली आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपींची एकमेकांशी हाणामारी झाली होती.

पंजाबच्या तुरुंगात कैद्यांमध्ये गँगवॉर
पंजाबच्या तुरुंगात कैद्यांमध्ये गँगवॉर

पंजाबच्या तरनतारन येथील गोइंदवाल साहिब तरुंगात रविवार दुपारच्या सुमारस कैद्यांमध्ये गँगवॉर झाले. यामध्ये गँगस्टर मनदीप तूफान आणि गँगस्टर मनमोहन सिंग यांचा जागीच मृत्यू झाला तर बठिंडा येथील तिसरा गँगस्टर केशव गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला अमृतसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. तूफान आणि मनमोहन व केशव पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी होते. मनदीप तूफान याला पोलिसांनी गँगस्टर मणि रइयासोबत अटक केली होती. 

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर मनदीप सिंग तुफानचा तुरुंगात अन्य कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर त्याला इतरांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चकमकीत ३ ते ४ कैदी जखमी झाले आहेत. गँगस्टर मनदीप तुफान जग्गू हा भगवानपुरिया टोळीचा सदस्य होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पंजाबचे डीएसपी जसपाल सिंग ढिल्लो यांनी सांगितले की, गोइंदवाल साहिब जेलमध्ये कैद्यांमध्ये मारामारी झाली. त्यामध्ये रय्या निवासी दुरान मनदीप सिंग तूफान मारला गेला. बठिंडा निवासी केशव आणि बुढलाडा निवासी मनमोहन सिंह मोहना यांना सरकारी रुग्णालय तरनतारन येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान मनमोहन याचा मृत्यू झाला. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरमीत सिंह चौहान यांनी सांगितले की, मारले गेलेल्या कैद्यांविरुद्ध अन्य काही प्रकरणात खटला सुरू होता. तिघे जण एकाच टोळीशी संबंधित होते. 

सिद्धू मुसेवालाच्या हत्येपूर्वी गुंड मनदीप सिंग तुफान आणि मणि रैया यांनी त्याच्या घराची १०  दिवस रेकी केली होती. दोन्ही आरोपींनी रेकी करून कॅनडामध्ये बसलेल्या गोल्डी याला सर्व माहिती दिली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा संपूर्ण कट तिथूनच रचला होता.

टी-२० वर्ल्डकप २०२४