Attacks On Police: पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर तलवारीनं हल्ला; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Attacks On Police: पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर तलवारीनं हल्ला; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Attacks On Police: पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर तलवारीनं हल्ला; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Updated Jun 25, 2024 04:11 PM IST

Punjab Man Attacks Cop: पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर हल्ला करण्यात आला, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video: लुधियानातील मोती नगर पोलिस ठाण्यात घुसून एका व्यक्तीने कर्तव्यावर असलेला हेड कॉन्स्टेबलवर तलवारीने हल्ला केला. या घटनेत हेड कॉन्स्टेबल जखमी झाला. संपूर्ण घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी हल्लेखोराला पकडून स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सहायक पोलिस आयुक्त जसबिंदर सिंह यांनी दिलेल्याा माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. एक व्यक्ती हातात तलवार घेऊन पोलीस ठाण्यात आला आणि त्याने हेड कॉन्स्टेबलवर हल्ला केला. यावेळी ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. मात्र, या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल किरकोळ जखमी झाला आहे.

मुंबई: भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला

मुंबईच्या मुलुंड परिसरात अंत्यसंस्कारावरून नातेवाईकामध्ये पेटलेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी मुलुंड पश्चिम येथील स्मशानभूमीत घडली. या घटनेत महिला कॉन्स्टेबलसह ३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

मुलुंड पश्चिम येथील इंदिरा नगर या ठिकाणी राहणारा नेपाळी नागरिक पप्पू सिंहचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी पुणे, ऐरोली, मुंबई येथून त्यांचे नातेवाईक आले होते. मृतदेहावर अंत्यविधी करण्यावरून त्यांच्या आपापसात वाद झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दिनेश थलारी, नवराज ठाकूर, अभिषेक थलारी, सचिन दास, सुनील थलारी, राहुल परिहार असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर