Archana express accident in Panjab : पंजाबमध्ये पुन्हा एकदा रेल्वेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. या निष्काळजीपणामुळे आज मोठा अपघात झाला असता. लुधियानामधील खन्ना स्थानका दरम्यान, रुळावरून धावणाऱ्या अर्चना एक्स्प्रेसचे इंजिन बोगीपासून अचानक वेगळे झाले. ही बाब लोको पायलटच्या लक्षात आली नाही. यामुळे बोगींशिवाय हे इंजिन सुमारे तीन किलोमीटर धावत राहिले. ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अलार्म वाजवत याची माहिती ड्रायव्हरला दिली. यानंतर चालकाने इंजिन थांबवत बोगी जेथे थांबल्या त्या ठिकाणी इंजिन नेऊन बोगींना जोडले. सुदैवाने या वेळेत या ट्रॅकवरुन दुसरी रेल्वे आली नाही. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या ट्रेनमध्ये दोन ते अडीच हजार प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १२३५५/५६ अर्चना एक्स्प्रेस पटनाहून जम्मूला जात होती. सरहिंद जंक्शन येथे या ट्रेनचे इंजिन बदलण्यात आले. यानंतर खन्ना येथे या एक्सप्रेसचे इंजिन बोगी पासून वेगळे झाले. हे इंजिन सुमारे ३ किलोमीटर बोगींशिवाय धावत राहिले. ही घटना आज सकाळी ९.२० वाजता घडली. ट्रॅकवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी मोठा अलार्म वाजवून चालकाला याची माहिती दिली.
चालकाने तातडीने इंजिन थांबवून पुन्हा बोगींजवळ नेले. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. ड्रायव्हरने इंजिन परत आणल. यानंतर ते बोगींना जोडण्यात आले. या अपघातामुळे रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. बॉक्स आणि इंजिनमधील क्लॅम्प तुटल्याने इंजिन वेगळे झाले. रेल्वे प्रशासनाने सध्या या अपघाताची त्याची चौकशीचे आदेश दिले आहेत.
या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. इंजिन खन्ना स्थानकाच्या पुढे बोगीपासून वेगळे झाले. आणि पुढे जात राहिले. तर तब्बल अडीच हजार प्रवाशांनी भरलेले डब्बे हे समराळा उड्डाणपुलाजवळ थांबले. ट्रेनच्या कोच अटेंडंटने सांगितले की, अर्चना एक्स्प्रेस पटनाहून जम्मूला जात होती. सरहिंद जंक्शन येथे वाहनाचे इंजिन बदलण्यात आले. खन्नामध्ये इंजिन वेगळे झाले आणि ते ३ किमी पर्यंत पुढे गेले. या ची माहिती त्यांनी रेल्वे प्रशासनाला वायरलेसद्वारे दिली.
यापूर्वी २५ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावरून एक मालगाडी चालकाविना पंजाबच्या दिशेने धावली होती. सुमारे ८४ किलोमीटरपर्यंत ट्रेन धावत राहिली. बऱ्याच प्रयत्नांनंतर पंजाबमधील मुकेरियनमधील ऊंची बस्सीजवळ ट्रेन थांबवण्यात आली. या घटनेत रेल्वेने अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.
संबंधित बातम्या