मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लग्नास नकार दिल्यानं तरुणीची भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!

लग्नास नकार दिल्यानं तरुणीची भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!

Jun 09, 2024 12:46 PM IST

Punjab Man Kills Woman: पंजाबच्या मोहालीमध्ये भररस्त्यात तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पंजाबच्या मोहालीमध्ये भररस्त्यात तरुणीची हत्या
पंजाबच्या मोहालीमध्ये भररस्त्यात तरुणीची हत्या

Punjab Murder: पंजाबच्या मोहालीमध्ये शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीची भररस्त्यात तलवारीने हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत तरुणी कामवर जात असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बलजिंदर कौर (वय, २६) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर, अटक करण्यात आलेल्या आरोपीची अद्याप उघड झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बलजिंदर ही मोहालीच्या फेज ५ मधील एका बँकेत काम करत होती. नेहमीप्रमाणे ती शनिवारी सकाळी ड्युटीवर जात असताना आरोपीने तिच्यावर तलवारीने हल्ला केला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बलजिंदरने खूप प्रयत्न केले. मात्र, आरोपी तिचा पाठलाग करत तिच्यावर तलवारीने हल्ला केला. तरुणी जखमी होऊन खाली पडल्यानंतरही आरोपीने तिच्यावर हल्ला सुरूच ठेवला. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. जखमी अवस्थेत तरुणीला मोहालीच्या सिव्हिल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

तरुणीच्या डोक्याला, हाताला आणि पोटाला गंभीर दुखापत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपीचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. मुलगी रिक्षामधून उतरताच आरोपीने तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि सोबत घेऊन आलेल्या तलवारीने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला, हाताला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संबंधित तरुणी पंजाबची रहिवाशी होती.

आरोपीच्या आईचा धक्कादायक खुलासा

या घटनेवर आरोपीच्या आईने प्रतिक्रिया दिली. आरोपीच्या आईचे म्हणणे आहे की, मृत तरुणीचे माझ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि ती दोन वेळा त्यांच्या घरीही आली होती. तिने त्याच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते आणि आता ती नकार देत होती. त्यामुळे माझा मुलगा नैराश्यात गेला होता. तो शनिवारी सकाळी घरातून निघाला, पण तो एवढे मोठे पाऊल उचलेल हे आम्हाला माहीत नव्हते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग