Rishi Sunak: दिगंबर दराडे लिखित ऋषी सुनक या पुस्तकास प्रचंड प्रतिसाद, आठ दिवसांत तिसरी आवृत्ती
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rishi Sunak: दिगंबर दराडे लिखित ऋषी सुनक या पुस्तकास प्रचंड प्रतिसाद, आठ दिवसांत तिसरी आवृत्ती

Rishi Sunak: दिगंबर दराडे लिखित ऋषी सुनक या पुस्तकास प्रचंड प्रतिसाद, आठ दिवसांत तिसरी आवृत्ती

Updated May 20, 2023 05:29 PM IST

Rishi Sunak: दिगंबर दराडेंच्या मराठी पुस्तक ऋषी सुनक प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

British PM Rishi Sunak
British PM Rishi Sunak

Pune: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेल्या पुस्तकांची मोठ्या संख्येनं विक्री होत आहे. अवघ्या आठ दिवसांमध्ये २००० प्रतींची तिसरी आवृती आली आहे. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. या पुस्तकाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे.

एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले, "ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांमध्ये आम्ही तिसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे."

"मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे", अशी ऋषी सुनक यांनी प्रतिक्रिया दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर