मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pune Crime : व्यवसायात गुंतवणुकीच्या अमिषाने घातला ३ कोटी रुपयांचा गंडा

Pune Crime : व्यवसायात गुंतवणुकीच्या अमिषाने घातला ३ कोटी रुपयांचा गंडा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 05, 2022 03:28 PM IST

जुन्या गाड्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगल्या परतव्याच्या आमिषाने एकाची ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

Pune Crime News
Pune Crime News (HT_PRINT)

पुणे : एका व्यवसायिकाला जुन्या गाडया खरेदी-विक्री व्यवसायात गुंतवणुक केल्यास चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून त्याची तब्बल ३ कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्वारगेट दोन आरोपीवर गुन्हा दखल करण्यात आला आहे.

कपिल जगमोहन धिंग्रा (वय ४०, रा.वाकड,पुणे) आणि गौरी कपिल धिंग्रा (रा.मुकुंदनगर,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेश रामचंद्र मेहता (वय ५५, रा. मुकुंदनगर) यांनी तक्रार दाखल केली. हा प्रकार २०१२ ते २०१७ च्या दरम्यान घडला. आरोपी कपिल धिंग्रा व गौरी धिंग्रा यांनी संगनमत करुन व्यवसायिक राजेश मेहता यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्यासोबत कार व्यवसायातून ओळख वाढवून मेहता यांना जुन्या गाडया खरेदी विक्री व्यवसायात ५० टक्के भागीदारी देण्याचे अमिष दाखवून २ कोटी रुपये देण्यास भाग पाडले.

 मात्र, नंतर पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने मेहता यांनी तुमच्या विरोधात पोलिसांत तक्रार देणार असल्याचे सांगितल्यावर त्यांना दिलेल्या रक्कमेपैकी ८० लाख रुपयाच्या मोबदल्यात त्यांचा वाकड परिसरातील प्रिस्टीन प्रोफाईल येथील उच्चभ्रु सोसायटीतील राहता फ्लॅट देत असल्याचे अॅग्रीमेंट ऑफ असायमेंन्ट करार करुन हा फ्लॅट मेहता यांच्याकडे ताबा दिलेला असताना ही, फ्लॅट त्यांच्या परवानगी शिवाय कैलास कदम या व्यक्तीस परस्पर विक्री करुन त्यांची फसवणुक करण्यात आली आहे. तसेच उर्वरित रक्कम टप्प्या टप्प्याने देण्याचे अाश्वासन देऊन ती रक्कम परत करण्यास टाळाटाळ करुन व्यवसायात नुकसान झाल्याचा बनाव करुन तक्रारदार यांच्याकडून ब्रेंन्डेड कार खरेदी करुन एकूण तीन कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आली.

IPL_Entry_Point

विभाग