मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hasan Ali Died : पुण्यातील भंगार विक्रेता ते अब्जाधीश ; वादग्रस्त हसन अली यांचे निधन

Hasan Ali Died : पुण्यातील भंगार विक्रेता ते अब्जाधीश ; वादग्रस्त हसन अली यांचे निधन

Feb 25, 2023 11:24 AM IST

भंगार विक्रेता ते बडे उद्योगपती, मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले पुण्याचे हसन अली खान यांचे वयाच्या ७१ वर्षी निधन झाले.

 Hasan Ali Died
Hasan Ali Died

पुणे : भंगार व्यवसाईक ते बडे उद्योजक, हेद्राबादचा घोडेवाला तसेच अब्जावधी रुपयांची माया स्विस बँकेत दडवून ठेवणारे पुण्यातील बडे व्यावसायिक हसन अली खान यांचे हेद्राबाद येथील रुगालयात वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. मनी लाँड्रिंगप्रकरणी आयकर विभाग, सीबीआय आणि ईडीच्या रडारवर हसन अली होते. या प्रकरणी त्यांना २०११मध्ये अटक करण्यात आली होती. ते चार वर्ष तुरुंगात होते. त्यांना २०१५ मध्ये जामीन मिळाला होता.

ट्रेंडिंग न्यूज

हसन अली खान यांचा जन्म हा सर्वसामान्य कुटुंबात १९५३ मध्ये हैदराबाद येथील एका गावात झाला होता. त्यांचे वडील उत्पादन शुक्ल विभागात कार्यरत होते. सुरवातीला त्यांनी भंगार व्यवसाय केला. यात यश मिळाल्याने त्यांनी अनेक व्यवसाय केले. काही दिवसांत त्यांनी भरारी घेतली. हसन अली १९९९ मध्ये पुण्यात आले त्यानंतरही त्यांच्या प्रगतीचा आलेख हा वाढता राहीला.

हसन अली खान यांनी अनेक व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची माया जमवली. मात्र, त्यावरील कर न भरता त्यांनी शासनाची फसवणूक केली. त्यांनी कर चुकवत हा पैसा स्विस बँकेत जमा केला. या प्रकरणी ते आयकर आणि ईडीच्या रडारवर आले होते. तब्बल सात प्रकरणात त्यांचावर गुन्हा दखल करण्यात आला होता. हैदराबादमध्ये देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

हसन अली खान यांनी घोडेपालन आणि शर्यतीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून त्यांची चांगलीच भरभराट झाली. त्यांच्या मेहुण्याच्या मदतीने खान यांनी हेद्राबाद येथील रेसकोर्समध्ये घोडे पाठवले. यामुळे त्यांची ओळख ही 'हैदराबादचा घोडावाला' म्हणून झाली. त्यानंतर देशभरात त्यांनी शर्यतीत घोडे पळवले. एवढेच नाही तर स्वित्झर्लंड आणि लंडनमध्ये देखील त्यांचे घोडे धावले.

 

दरम्यान, त्यांनी करचुकवल्याने ते आयकर आणि ईडीच्या रडारवर आले होते. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांच्यावर २००२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. १५ जानेवारी २००७ रोजी आयकर विभागाने त्यांच्या पुण्यातील कोरेगाव येथील निवासस्थानावर छापा टाकला. यात अली यांचे मोठे घबाड तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले. हसन अली यांनी स्विस बँकेत सुमारे ३६ हजार कोटी रुपये जमा केले. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना ७ मार्च २०११ रोजी अटक केली होती.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग