मोठी बातमी! पूजा खेडकर हिची भारतीय प्रशासकीय सेवेतून हकालपट्टी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय-puja khedkar dismissed from ias weeks after upsc cancelled her selection ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मोठी बातमी! पूजा खेडकर हिची भारतीय प्रशासकीय सेवेतून हकालपट्टी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! पूजा खेडकर हिची भारतीय प्रशासकीय सेवेतून हकालपट्टी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Sep 07, 2024 07:16 PM IST

Centre discharges Puja Khedkar from IAS: यूपीएससीने निवड रद्द केल्यानंतर पूजा खेडकर यांची आता केंद्र सरकारने आयएएसमधून हकालपट्टी केली आहे. पूजा खेडकर यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

यूपीएससीनंतर आता केंद्र सरकारनं मोठ पाऊल पूजा खेडकरची भारतीय प्रशासकीय सेवेतून हकालपट्टी
यूपीएससीनंतर आता केंद्र सरकारनं मोठ पाऊल पूजा खेडकरची भारतीय प्रशासकीय सेवेतून हकालपट्टी

Centre discharges Puja Khedkar from IAS: बनावट प्रमानपत्रं सादर करून आयएसएस झालेल्या पूजा खेडकर यांना आता यूपीएससी नंतर केंद्र सरकारने मोठा दणका दिला आहे. सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आयएएस प्रोबेशनर पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने पूजा खेडकरची भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) हकालपट्टी केली आहे.

केंद्र सरकारने IAS (प्रोबेशन) नियम, १९५४ च्या नियम १२ अंतर्गत पूजा खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) ताबडतोब कार्यमुक्त केलं आहे. फसवणूक आणि ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या फायद्यांचा खोटी कागदपत्र सादर करून गैरवापर केल्याच्या आरोपांना तोंड देत, यूपीएससीने खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली.

दरम्यान, यापूर्वी, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला देखील विरोध केला होता आणि म्हटले की तिने केवळ आयोगाचीच नव्हे तर जनतेचीही फसवणूक केली. कारण पूजा खेडकर या नागरी सेवा परीक्षांना (सीएसई) बसण्यास अपात्र आहे.

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या अर्जात आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा आरोप झाल्यानंतर खेडकर यांच्या कायदेशीर अडचणींना सुरुवात झाली. यूपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी तिच्यावर २०२२ आणि २०२३ च्या परीक्षेसाठी दोन वेगवेगळ्या कागदपत्रांसह बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला आहे. ३१ जुलै रोजी खेडकर यांची उमेदवारी रद्द करणाऱ्या यूपीएससीने यापूर्वी म्हटले होते की, त्यांनी आयोग आणि जनतेविरोधात फसवणूक केली आहे आणि या कटाची संपूर्ण व्याप्ती उघड करण्यासाठी त्यांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे.

पूजा खेडकर या पुण्यात ट्रेनी आयएएसअधिकारी असतांना त्यांनी अनेक वाजवी मागण्या केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे केबिन देखील बळकावले होते. यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच यूपीएससीने देखील त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणानंतर पूजा खेडकर फरार होत्या. त्यांनी अंतरिम जमिन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यूपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी त्यांचा अटकपूर्व जामीन याचिका फेटाळण्याची मागणी केली. कारण पूजा खेडकरने कोणत्याही प्रकारचा दिलासा दिल्याने तपासात अडथळा येईल. तसेच या प्रकरणाचा सार्वजनिक विश्वासावर व्यापक परिणाम झाला आहे व यामुळे नागरी सेवा परीक्षेच्या विश्वासहर्ततेवर देखील परिमाण झाला असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता.

जुलैमध्ये, यूपीएससीने फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या पूजा खेडकरची तात्पुरती उमेदवारी रद्द केली. यूपीएससीने पूजा खेडकर हिला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले व तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून बाद केले.

काय होत प्रकरण वाद?

पूजा खेडेकर (वय ३४) ही पुण्यात ट्रेनी आयएएसअधिकारी असतांना तिने तिच्या खाजगी ऑडी कारवर लाल अंबर दिवा लावला होता. तसेच तिने एका वरिष्ठ अधिकार्याचे केबिन देखील बळकावले होते. या प्रकरणी जिल्हाधिकारी सुरेश दिवेसे यांनी राज्य सरकार आणि आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर त्यांनी वाशिम येथे बदली करण्यात आली होती. यानंतर पूजा खेडकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. त्यांची अनेक प्रकरणे उघडकीस आली. सरकारने तिचा 'जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम' रोखून धरला होता, तिला "आवश्यक कारवाईसाठी" मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये पुन्हा परत बोलावले होते. खेडकर हिने दिलेले अपंगत्वाचे व ओबीसी प्रमाणप खोटे असल्याचे आढळले होते. त्याची चौकशी यूपीएससी मार्फत केली जात होती.

Whats_app_banner
विभाग