Pooja Khedkar Case: अटक करण्याची गरज नाही; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; ट्रायल कोर्टालाही फटकारलं-puja khedkar big relief delhi high court orders police not to arrest khedkar till august 21 ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pooja Khedkar Case: अटक करण्याची गरज नाही; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; ट्रायल कोर्टालाही फटकारलं

Pooja Khedkar Case: अटक करण्याची गरज नाही; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; ट्रायल कोर्टालाही फटकारलं

Aug 12, 2024 01:31 PM IST

Pooja Khedkar Case : पूजा खेडकरला २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. तिच्यावर नागरी सेवा परीक्षा फसवणुकीने उत्तीर्ण केल्याचा आरोप आहे.

अटक करण्याची गरज नाही; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; ट्रायल कोर्टालाही फटकारलं
अटक करण्याची गरज नाही; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; ट्रायल कोर्टालाही फटकारलं

Pooja Khedkar Case : पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने पूजा खेडकरच्या अटकेला २१ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. २१ ऑगस्ट पर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नागरी सेवा परीक्षा गैरमार्गाने उत्तीर्ण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले, खटल्याच्या पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत म्हणजेच २१ ऑगस्टपर्यंत याचिकाकर्त्याला अटक करण्याची गरज नाही. यासोबतच न्यायालयाने यूपीएससी आणि दिल्ली पोलिसांनाही याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या आदेशावरही टीका केली ज्यामध्ये त्यांना जामीन नाकारण्यात आला होता. उच्च न्यायालयाने म्हटले की, पूजा खेडकरला दिलासा देण्यास नकार देताना ट्रायल कोर्टाने खेडकर यांच्यावरील आरोपांपुढे तिच्या जामीन अर्जाचा योग्य विचार केला नाही. उच्च न्यायालयाने महटलं की, ट्रायल कोर्टाचा निर्णय गुन्ह्यावर आधारित आहे. हा गुन्हा झाला आहे. परंतु जामीन का मंजूर केला जाऊ शकत नाही याबद्दल कोर्टात चर्चा झाली नाही. न्यायमूर्ती प्रसाद म्हणाले की, मोठ्या प्रकरणांमध्ये न्यायालये अनेकदा आरोपांमध्ये अडकतात आणि याचिका कर्ताने मागितलेल्या न्यायाकडे दुर्लक्ष केले जाते.

हायकोर्ट म्हणाले, या मोठ्या खटल्यांमध्ये निर्माण झालेल्या वादात आपण इतके अडकतो की मागितलेला दिलासा विसरतो. ज्या उद्देशाने जामीन अर्ज दाखल केला होता त्याचा उद्देश आपण विसरतो.

यूपीएससी आणि दिल्ली पोलिसांना नोटीस का?

यूपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते की, हे प्रकरण सुनियोजित कटाशी संबंधित आहे आणि तपास अजूनही सुरू आहे. यूपीएससीचे वरिष्ठ वकील नरेश कौशिक म्हणाले, "खेडकर कुटुंबीयांनी गैरवापर करत यूपीएससीची फसवणूक केली. हा पूर्वनियोजित गुन्हा आहे. अशा परिस्थितीत खंडपीठाने पोलिस आणि यूपीएससीला देखील या कथित कटाचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. या खटल्या अंतर्गत पूजा खेडकरला कोठडीची गरज का आहे ? याचे उत्तर देखील मागितले आहे.

खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या याचिकेवर न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी केली. तर खेडकर यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सिद्धार्थ लुथरा यांनी तर युपीएससीच्या वतीने नरेश कौशिक यांनी न्यायालयात बाजू मांडली.

काय आहे प्रकरण ?

युपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर पूजा खेडकरची पुण्यात ट्रेनी आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, पुण्यात असतांना त्यांनी मनमानी पद्धतीने कारभार केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका उच्च अधिकाऱ्यांची केबिन ते नसतांना त्यांनी बळकावली. तसेच परवानगी नसतांना त्यांनी त्यांच्या आलीशान ऑडि कारला अंबर दिवा लावला होत. त्यानंतर त्यांच्या बाबत अनेक गोष्टी पुढे आल्या. त्यांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रमापत्रा विषयी देखील शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. दरम्यान, पुण्यातील त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. दरम्यान, त्यांचा अहवाल राज्य शासन आणि यूपीएससीला पाठवण्यात आला होता. यानंतर खेडकर यांना मसुरीतील अकादमीत हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पूजा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्यांची सेवा रद्द करण्यात आली होती.

विभाग