मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PSPCL Recruitment: पीएसपीसीएल येथे कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती; ९ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू

PSPCL Recruitment: पीएसपीसीएल येथे कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती; ९ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 06, 2024 06:40 PM IST

PSPCL JE Recruitment 2024: पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये येत्या ९ फेब्रुवारी २०२४ पासून कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्ज मागिवले आहेत.

PSPCL JE Recruitment 2024: Registration for 544 posts begins on February 9
PSPCL JE Recruitment 2024: Registration for 544 posts begins on February 9

पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच पीएसपीसीएल येथे कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार pspcl.in येथे पीएसपीसीएलच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. पीएसपीसीएलमध्ये भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 

अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, "पीएसपीसीएल जाहिरात क्र. सीआरए-३०३/२४ येथे जेई/इलेक्ट्रिकल, जेई/सब-स्टेशन आणि जेई/सिव्हिल पदांच्या एकूण ५४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.  येत्या ०९ फेब्रुवारी २०२४ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ मार्च २०२४ आहे.

PNB Recruitment: बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी, पंजाब नॅशनल बँकेत बंपर भरती; लवकरच अर्ज प्रक्रियेला सुरुवात

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम पीएसपीसीएलच्या अधिकृत वेबसाईट pspcl.in भेट द्यावी. 
  • होम पेजवर उपलब्ध रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल.
  • त्यानंतर अकाऊंटमध्ये लॉगिन करा आणि अर्ज शुल्क भरा.
  • सबमिटवर क्लिक करा आणि पेज डाऊनलोड करा.
  • पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

 

अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार पीएसपीसीएलची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

WhatsApp channel