मंड्या जिल्ह्यातील प्रसिद्ध कल्लभैरवेश्वर मंदिरात (Kalabhairaveshwara Swamy Temple) दलितांच्या प्रवेशाच्या निषेधार्थ मंदिरातील मूर्ती गाभाऱ्यापासून दूर हलविण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील काही लोकांनी मंदिर उत्सवादरम्यान मंदिराच्या आवारात उत्सवाची मूर्ती वेगळी ठेवली होती. मंड्या शहरापासून १३ किमी अंतरावर हणकेरे गावात हे मंदिर आहे. दलितांच्या प्रवेशावरून वाद सुरू झाल्यानंतर सरकारी अधिकारी आणि पोलिसांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यानंतर दलितांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर शेकडो वर्षे जुने असून नुकतेच त्याच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले आहे. काँग्रेसचे माजी आमदार एम. श्रीनिवास यांनी त्याचा जीर्णोद्धार करून घेतला. परंपरेनुसार दलितांना त्यात प्रवेश देण्यास गावातील काही लोकांचा विरोध होता. गावात दलितांसाठी स्वतंत्र मंदिर बांधण्यात आले आहे.
दलितांना मंदिरात प्रवेश दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी उत्सव मूर्ती मंदिराच्या आवारातील दुसऱ्या ठिकाणी हलविली. मंदिरात आम्ही खर्च केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मूर्ती हलवल्यानंतर गदारोळ सुरू झाला आणि त्यानंतर मंदिर बंद करावे लागले. त्यानंतर एका दिवसानंतर मंदिराचे दरवाजे उघडून पूजा करण्यात आली.
मंड्या जिल्ह्यातील हणकेरे गावातील मंदिरात रविवारी दलितांना प्रवेश आणि पूजा करण्याची परवानगी होती. यावेळी गावातील सवर्णांनी संताप व्यक्त करत मंदिरातील कालभैरवेश्वाची मूर्ती काढून परिसरातील दुसऱ्या मंदिरात ठेवली. यामुळे गावात तणावाची परिस्थिती आहे. यामुळे हणकेरे येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावात एक प्राचीन काळभैरवेश्वर स्वामी मंदिर आहे. ज्यामध्ये अनेक वर्षापासून दलितांना प्रवेश दिला जात नव्हता. सुमारे तीन वर्षांपूर्वी मंदिराची जुनी जीर्ण इमारत पाडून त्याठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात आले. नुकतेच हे मंदिर राज्य सरकारच्या धार्मिक बंदोबस्त विभागांतर्गत आले. काही महिन्यांनी दलितांनी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पण गावातील काही उच्चवर्गीयांना हे मान्य नव्हते. त्यांनी आधीची परंपरा सुरू ठेऊन दलितांना प्रवेश नाकारला.
त्यानंतर दलितांनी जिल्हा प्रशासनाकडे गावात भेदभाव होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर दोनदा शांतता बैठक झाली, पण यातून काहीच तोडगा निघू शकला नाही व बैठक अयशस्वी झाली. अखेर रविवारी पोलिस बंदोबस्तात दलितांनी मंदिरात प्रवेश केला व पूजा केली. यामुळे नाराज होऊन उच्चवर्णीयांनी उत्सवमूर्ती काढून दुसरीकडे हलवली. यातून पुन्हा तनाव वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गदारोळानंतर आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर सर्व जातीच्या लोकांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली. याशिवाय खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तहसीलदार शिवकुमार म्हणाले की, आता हे प्रकरण मिटले असून या वादावर सावधगिरी बाळगली जात आहे.