POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर-protest in pakistan continue on monday demand for merger with india ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

May 13, 2024 02:08 PM IST

pok protest against Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज सरकार विरोधी आंदोलनामुळे सोमवारी पुन्हा एकदा शाळा आणि कार्यालये बंद ठेवावी लागली. आंदोलक मोट्या प्रमाणात रस्त्यावरच उतरले होते.

पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज सरकार विरोधी आंदोलनामुळे सोमवारी पुन्हा एकदा शाळा आणि कार्यालये बंद ठेवावी लागली.
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज सरकार विरोधी आंदोलनामुळे सोमवारी पुन्हा एकदा शाळा आणि कार्यालये बंद ठेवावी लागली.

pok protest against Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी पुन्हा एकदा शाळा आणि कार्यालये नागरिकांच्या निदर्शनामुळे बंद ठेवावी लागली. आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले असून आंदोकांनी भारतात सामील होण्याची मागणी केली आहे. ऐवढेच नाही तर रस्त्यावर भारताचे ध्वज देखील लावले आहेत. पीओकेच्या रावळकोटमध्ये भारतात विलीनीकरणाची मागणी करणारे पोस्टर घेऊन लोक बाहेर पडले आहेत.

Pune Weather update: पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण! दुपार नंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

पाकिस्तानने भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रांताचा अविभाज्य भाग असलेल्या आदिवासींच्या माध्यमातून हल्ला करून १९४७ मध्ये पीओकेवर बेकायदेशीरपणे कब्जा केला होता. पाकिस्तानने या भागावर बेकायदेशीर ताबा मिळवला असला तरी येथील नागरिक आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे पाक सरकार विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

Pune Weather update: पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण! दुपार नंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

शुक्रवारपासून पाक व्याप्त काश्मीरमध्ये सरकारने गहू आणि विजेचे दर वाढवले आहेत. यामुळे नागरिक संतप्त झाले असून पाक सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. रविवारी हे आंदोलं हिंसक झाले. नागरिकांनी पोलिसांना बेदम मारहाण केली तर गोळीबारात एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. अदनान कुरेशी असे या पोलिसाचे नाव आहे. तर १०० सुरक्षा कर्मचारी नागरिकांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने हे आंदोलन पुकारले आहे. हिंसक घटनांमध्ये आमचे कार्यकर्ते नाहीत असे समितीने म्हटले आहे. आमची बदनामी करण्यासाठी पाक लष्कर कट रचत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान पोलिसांनी आतापर्यंत ७० आंदोलकांना अटक केली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात अवामी कमिटीच्या लोकांच्या घरांवरही छापे टाकण्यात येत आहेत.

Viral News : भर विमानात जोडप्याने गाठला निर्लज्जपणाचा कळस! प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की....

गुरूवारी चक्का जामची घोषणा

गुरुवारी समितीने चक्का जामची घोषणा केली होती. त्यानंतर येथील आंदोलन हिंसक झाले आहे. सरकारने वाढवलेल्या किमती विरोधात शुक्रवारी लोक रस्त्यावर आले होते. या भागात वीजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर गहू आणि पिठाचे दर देखील वाढवले आहेत. त्यामुळे व्यवसाय करणे कठीण होत असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. याशिवाय महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या दोन वर्षांपासून गहू आणि पेट्रोलसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कमकुवत आर्थिक स्थितीमुळे पाकिस्तानची अवस्था वाईट झाली आहे. अशा परिस्थितीत पीओकेसारख्या भागात अराजकता आहे जो आधीच मागासलेला भाग आहे.

आम्हाला भारतात विलीन करा!

रावळकोटमधील अनेक आंदोलकांच्या हातात पोस्टर होते, ज्यात भारतात विलीन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावरून पीओकेमधील लोकांचा पाकिस्तानविरोधातील रोष दिसून येत आहे. या पोस्टर्समध्ये भारतात विलीनीकरणाची मागणी करण्यात आली आहे. काही आंदोलकांचे म्हणणे आहे की आंदोलनाला हिंसक वळण लागले कारण नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. रावळकोटशिवाय तट्टापानी, खुईरट्टा, मीरपूर, सेहंसा आणि मुझफ्फराबादमध्ये हे आंदोलन झाले आहे. पाकिस्तान सरकारनेही सोमवारी सर्व शैक्षणिक संस्था आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय लोकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी कलम जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

Whats_app_banner
विभाग