मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cerelac: मुलांना सेरेलॅक खाऊ घालणे धोकादायक? तपासात धक्कादायक माहिती उघड, कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी

Cerelac: मुलांना सेरेलॅक खाऊ घालणे धोकादायक? तपासात धक्कादायक माहिती उघड, कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी

Jun 14, 2024 10:32 AM IST

Nestle Cerelac News : नेस्ले कंपनीचे उत्पादन सेरेलॅक हे मुलांसाठी धोकादायक असल्याचा दावा जागतिक नागरी संस्था पब्लिक आय आणि आयडीएफएएनने केला आहे.

सेरेलॅक मुलांसाठी धोकादायक असल्याचा दावा केला जात आहे.
सेरेलॅक मुलांसाठी धोकादायक असल्याचा दावा केला जात आहे.

Nestle Cerelac Scam: आपल्या बाळांना फूड सप्लिमेंट म्हणून सेरेलॅक देणाऱ्या जगभरातील पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नेस्ले कंपनीचे प्रसिद्ध उत्पादन सेरेलॅक आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. कंपनी गरीब किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अनैतिक आणि अनुचित व्यवहार करत असल्याचा दावा जागतिक नागरी संस्था पब्लिक आय आणि आयडीएफएएन यांच्याकडून करण्यात आला आहे. या संस्थांनी नेस्लेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्विस स्टेट सेक्रेटरिएट फॉर इकॉनॉमिक अफेअर्सला आवाहन केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सेरेलॅक हे भारतासह जगभरातील विकसनशील देशांमध्ये विकली जात आहेत. पब्लिक आय आणि आयडीएफएएनने एप्रिलमध्ये कंपनीच्या दोन सर्वाधिक लोकप्रिय उत्पादनांमध्ये साखरेचा अतिवापर झाल्याची तक्रार केली होती, जे जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण

नेस्लेच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की, भारतात मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या सर्व कंपन्यांच्या उत्पादनांची फॉर्म्युला तपासली जात आहे. गेल्या पाच वर्षात भारतातील उत्पादनांमधील साखरेचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी केल्याचे कंपनीने म्हटले आहे. याआधी एप्रिलमध्ये हे प्रकरण चर्चेत आले होते, जेव्हा नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायण म्हणाले होते की सेरेलॅक नियमांनुसार त्यांची उत्पादने विकत आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, भारतात विक्री होत असलेल्या त्यांच्या उत्पदनांमध्ये नियमांपेक्षा खूपच कमी प्रमाणात साखरेचा वापर केला जातो.

हजारो नागरिकांच्या जीवनावर परिणाम

आक्रमक ब्रँडिंग आणि नियमांविरुद्ध साखरेचा अतिवापरामुळे गरीब देशांतील हजारो नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. केवळ मुलांसाठीच नव्हे तर नेस्लेच्या स्वत:च्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी हा प्रकार बंद केला पाहिजे, असे जागतिक नागरी संस्थांचे म्हणणे आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

मुलांच्या फूड मार्केटमध्ये नेस्लेचा २० टक्के वाटा

नेस्लेच्या व्यवसायावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, मुलांच्या फूड मार्केटमध्ये त्यांचा एकट्याचा २० टक्के वाटा आहे. २०२२ मध्ये कंपनीची एकूण विक्री २.३ अब्ज डॉलर इतकी होती.सेरेलॅक आणि निडो हे नेस्लेच्या लोकप्रिय उत्पादनांपैकी एक आहेत. या दोन्ही उत्पदनांना बाजारात मोठी मागणी आहे.

WhatsApp channel
विभाग