मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इंद्राणी मुखर्जी: ७ वर्षानंतर जेलमधून बाहेर; संपत्ती वाचून थक्क व्हाल..

इंद्राणी मुखर्जी: ७ वर्षानंतर जेलमधून बाहेर; संपत्ती वाचून थक्क व्हाल..

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 20, 2022 05:55 PM IST

इंद्राणी आणि पीटर मुखर्जी या दोघांचीही सर्वोच्च न्यायालयाने जामीनावर सुटका केली. मात्र इंद्राणी मुखर्जी यांची सेक्रेटरी काजल शर्मा यांनी मुखर्जी परिवाराच्या संपत्तीची सीबीआयला दिलेली माहिती थक्क करणारी आहे.

Indrani Mukerjea
Indrani Mukerjea (HT_PRINT)

शीना बोरा हत्याकांडातली प्रमुख आरोपी म्हणून इंद्राणी मुखर्जी यांचं नाव पुढे आलं होतं.जवळपास साडेसहा वर्षाचा तुरुंगवास भोगल्यावर खटला लवकर संपण्याची अपेक्षा नसल्याने कोर्टाने इंद्राणी मुखर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या रोखीच्या वैयक्तिक हमीवर तुरुंगातून सुटका केली आहे. काल पीटर मुखर्जी यांचीही कोर्टाने मुक्तता केली होती. मात्र मुखर्जी परिवाराची संपत्ती नेमकी आहे तरी किती हे ऐकाल तर थक्क व्हाल

इंद्राणी मुखर्जी यांची सेक्रेटरी काजल यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावलं होतं.मुखर्जींच्या अनेक प्रॉपर्टीजमध्ये काजल शर्मा यांच्या नावाचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याचा सीबीआयला संशय होता. काजल शर्मा यांच्या जबाबानुसार नोंदवल्या गेलेल्या सीबीआयच्या चार्जशीटमध्ये मुखर्जीं परिवाराच्या भारतातल्या आणि भारताबाहेरच्या अनेक प्रॉपर्टींचा समावेश असल्याचं आता समोर आलंय.

यापैकी मुखर्जी परिवाराच्या मालकीच्या तीन प्रॉपर्टी या मुंबईत आहेत, दोन गोव्यात आहेत,तीन युके मध्ये आहेत आणि एक स्पेनमध्ये आहे.मुंबईतल्या मार्लो इमारतीत मुखर्जींचे दोन फ्लॅटस आहेत.त्यापैकी पिटर यांचं ऑफीस असणारा फ्लॅट इंद्राणी आणि जुना नवरा संजीव खन्ना यांची मुलगी वैदैही हिला बक्षीसपत्राच्या रुपानं दिला आहे असं काजल शर्मा यांचं म्हणणं आहे.लोअर परेलच्या फिनीक्स मिल इथं मुखर्जींची एक ऑफीस प्रॉपर्टी आहे. काजल शर्मा यांच्या म्हणण्यानुसार त्या जागेची नेमकी किंमत त्यांना माहिती नसली तरी जवळपास साडेचार लाख रुपये महिना इतकं भाडं त्यांना दरमहा मिळतंय.जे इंद्राणीच्या एसबीआय बँकेच्या खात्यात जमा होतात.

या दोघांकडे ६२ लाख रुपये किमतीचे दोन फ्लॅटस गोव्यात आहेत. याशिवाय गुरुग्राम इथल्या सुशांत टॉवर २ मध्ये त्यांचा एक फ्लॅट होता जो ४२ लाख रुपयांना विकला होता.

भारताबाहेरच्या मालमत्ता

पीटर आणि इंद्राणी ब्रिटीश सिटीझन आहेत. त्यांची स्नेक पार्क युके इथं मालमत्ता आहे. या मालमत्तेची माहिती काजल शर्मा यांना नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र सीबीआयच्या माहितीनुसार मुखर्जी यांच्या दोन मालमत्ता ब्रिस्टॉल इथं आणि एक लंडन इथं आहे. या मालमत्तेचं भाडं म्हणून मुखर्जींना २० लाख रुपये २०१३मध्ये मिळाले होते.३९ बालमोरल हाऊस,कॅनॉन्स वे आणि ९ पर्सिव्हल कोर्ट,क्लिफ्टन या ब्रिस्टॉलमधल्या मालमत्तांचे पत्ते आहेत तर लंडन इथंल्या मेरेडियन हाऊस इथं मुखर्जी परिवाराचा एक फ्लॅट आहे.

याशिवाय स्पेन इथंही या दांपत्याची मालमत्ता असल्याचं समजतंय.याची माहिती काजल शर्मानं दिली नव्हती.इथं मुखर्जी परिवार नेहमी सुट्टी घावण्यासाठी येत असत. इथे इंद्राणी यांच्या नावावर दोन गाड्या आहेत. होंडा अमेझ आणि मर्सडीझ बेन्झ. ज्यांची किमत अनुक्रमे साडेआठ लाख आणि २५ लाख होती.

काजल शर्मा यांनी मुखर्जी परिवाराच्या १० बँक खात्यांचीही माहिती सीबीआयला दिली आहे. यात पीट आणि इंद्राणी यांची तीन एकत्रीत खाती (Joint Account) आहेत.याशिवाय प्रत्येकी दोन दोन खाती ऍक्सीस बँकेत आणि कोटक महिंद्रा बँकेत आहेत.इंद्राणी यांची दोन खाती एसबीआय बँकेत आहेत.वैदेहीच्या नावावर एक ऍक्सीस आणि एक सिंडिकेट बँकेत खातं असल्याचं समजतंय.

WhatsApp channel