Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट, काय होतं कारण?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट, काय होतं कारण?

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट, काय होतं कारण?

Dec 05, 2024 12:24 AM IST

Priyanka Gandhi Meet Amit Shah : काँग्रेससरचिटणीस व वायनाडच्या नवनियुक्त खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी केरळमधीललोकसभा सदस्यांसह बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांनामदत करण्याचे आवाहन केले.

प्रियंका गांधींनी घेतली अमित शहांची भेट
प्रियंका गांधींनी घेतली अमित शहांची भेट (PTI)

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केरळमधील अनेक लोकसभा सदस्यांची भेट घेऊन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी मदतीची विनंती केली. संसद भवन परिसरातील शहा यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीला केरळमधील काँग्रेस, आययूएमएल आणि आरएसपीचे खासदार उपस्थित होते.

काँग्रेस सरचिटणीस व वायनाडच्या नवनियुक्त खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी केरळमधील लोकसभा सदस्यांसह बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. संसद भवन संकुलातील शाह यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. 

शहा यांची भेट घेतल्यानंतर वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वायनाडमधील परिस्थितीची माहिती दिली आहे. भूस्खलनामुळे तेथील लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. लोकांची कुटुंबे आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्याकडे आधार यंत्रणा शिल्लक नाही.

अशा परिस्थितीत केंद्र सरकारने काहीच केले नाही तर जनतेची काय अपेक्षा असेल, असा सवाल त्यांनी केला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन वायनाडच्या जनतेला मदत करावी, असे आवाहन आम्ही गृहमंत्र्यांना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील पीडितांची भेट घेतली तेव्हा लोकांना मदतीची अपेक्षा होती, पण अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.

वायनाडमध्ये यावर्षी जुलै महिन्यात भूस्खलन होऊन अनेकांचा मृत्यू झाला होता. वायनाडच्या जनतेला राजकारणाच्या पलीकडे जाऊन मदत करावी, अशी विनंती मी त्यांना केली आहे. पुरामुळे सर्वांची घरे, शाळा सर्व वाहून गेल्या असून या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकांना मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे. अशा वेळी वायनाडच्या पीडितांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन मदत करायला हवी. आम्ही पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांना निवेदन दिले असून सरकारने पीडितांना मदत करावी, अशी विनंती केली आहे.

जनतेच्या समस्यांची आपल्याला जाणीव असून त्यांना शक्य तेवढी मदत करू, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर