मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Congress : भावाची खासदारकी रद्द होताच प्रियांका गांधींनी शेयर केली भ्रष्टाचाऱ्यांची यादी, म्हणाल्या…

Congress : भावाची खासदारकी रद्द होताच प्रियांका गांधींनी शेयर केली भ्रष्टाचाऱ्यांची यादी, म्हणाल्या…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 24, 2023 04:20 PM IST

Rahul Gandhi Disqualification : माझा भाऊ कधीही कुणाला घाबरलेला नाही, यापुढेही कुणाला घाबरणार नाही, असं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटलंय.

Congress leader Rahul Gandhi with Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra
Congress leader Rahul Gandhi with Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra (Bharat Jodo Twitter)

Priyanka Gandhi On Rahul Gandhi Disqualification : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळं सूरतमधील कोर्टानं राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता याच प्रकरणाचा आधार घेत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. त्यामुळं देशभरात काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या भगिणी प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याशिवाय प्रियांका गांधी यांनी देशातील भ्रष्टाचाऱ्यांची यादीच ट्वीटरवर शेयर केली आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

राहुल यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ज्या लोकांनी पैसा लुटला त्यांचा भारतीय जनता पार्टी बचाव करत आहे. चौकशीपासून पळ काढला जात आहे. आणि जे लोक या गैरव्यवहारांवर प्रश्न करतायंत त्यांच्यावर खटले दाखल करत कारवाई केली जात असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला आहे. याशिवाय नीरव मोदीने १४ हजार कोटींचा घोटाळा केला. ललित मोदी (४२५ कोटी), मेहुल चोक्सी (१३,५०० कोटी) या उद्योजकांची यादीच प्रियांका गांधी यांनी शेयर केली आहे.

सूरतमधील कोर्टानं राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतरही प्रियांका गांधी यांनी भाजपवर तुफान हल्लाबोल केला होता. सत्ताधारी भाजपकडून साम, दाम, दंड आणि भेद वापरून राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या भावाला कुणाची कधीही भीती वाटली नाही आणि कधीही वाटणार नाही. सत्य बोलत जगलो, सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू. सत्याची शक्ती आणि कोट्यवधी देशवासियांचे प्रेम त्यांच्या पाठीशी असल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलं होतं.

WhatsApp channel