प्रेम कधी व कोणासोबत होईल हे सांगता येत आहे. हे एक असे फूल आहे, जे वाळवंटापासून डोंगर, दऱ्या-खोऱ्या व जंगलात सगळीकडे फुलते. इतकेच नाही तर तुरुंगातही या फुलाला बाहर येतो. यूपीमधील अमरोहा येथे एक कैदी पोलीस व्हॅनमधून उडी मारून पळून गेला. रात्रभर पोलीस कर्मचारी त्याच्या शोधात भटकत राहिले. दुसऱ्या दिवशी त्याला पकडण्यात आले. पोलीस चकमकीत त्याच्या पायात गोळी लागली आहे. पकडल्यानंतर त्याने पळून जाण्यामागचा उद्देश सांगितला. त्याचे पळून जाण्याचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले. त्याची कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे.
ही घटना दोन दिवसापूर्वीची आहे. जेव्हा वाजिद अली नावाच्या कैद्याला मुरादाबाद तुरुंगातून पोलीस व्हॅनमधून अमरोहाकडे नेले जात होते. दरम्यान धावत्या व्हॅनमधून त्याने अमरोहा-जोया रोडवर धावत्या व्हॅनमधून उडी मारली. पोलीस कस्टडीमधून कैदी फरार झाल्याने खळबळ माजली. पोलिसांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा काहीच ठिकाणा लागला नाही. दुसरीकडे कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे व्हॅन चालकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलिसांना धक्का देत वाजिद अलीने चालत्या व्हॅनमधून उडी मारली होती, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाजिद वर्षभरापासून मुरादाबाद तुरुंगात बंद होता. तुरुंगात त्याची रिझवान नावाच्या दुसऱ्या कैद्याशी ओळख झाली. त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. वाजिद तुरुंगात असताना त्याची पत्नी त्याला रोज भेटायला येत होता. वाजिदने पत्नीची ओळख रिझवानशी करुन दिली. यानंतर वाजिदची पत्नी आणि रिझवानमध्ये जवळीक वाढली.
रिझवान वाजिदच्या आधी तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातून सुटल्यानंतर रिझवान वाजिदच्या पत्नीला भेटला आणि दोघंही फरार झाले. या गोष्टीची खबर वाजिदला तुरुंगात लागली आणि तो प्रचंड संतापला. त्याने रिझवान व पत्नीचा बदला घेण्याचे ठरवलं. पण तुरुंगात असल्यामुळे तो काहीच करु शकत नव्हता. त्यामुळे तो तुरुंगातून बाहेर पडण्याची संधी शोधू लागला. त्याला मुरादाबाद तुरुंगातून बाहेर काढताना त्याला पोलीस व्हॅनमधून पळून जाण्याची एक संधी मिळाली. कोर्टात नेताना त्याने पोलिसांना चकमा देत धावत्या पोलीस व्हॅनमधून उडी मारली आणि फरार झाला. रिझवान आणि पत्नीला धडा शिकवण्यासाठी त्याने दोघांचा शोध सुरु केला. पण काही तासातच पोलिसांनी त्याला पकडले.