अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या कुटुंबीयांना २०२३ मध्ये परदेशी नेत्यांकडून असंख्य भेटवस्तू मिळाल्या. मात्र या सर्व भेटवस्तूंपैकी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला २० हजार डॉलर्स किमतीचा हिऱ्याची गिफ्ट ही सर्वात महागडी गिफ्ट ठरले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नुकतेच वार्षिक लेखा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार पंतप्रधान मोदी यांनी जिल बायडेन यांना दिलेला हिरा हा ७.५ कॅरेटचा होता. २०२३ या सालात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीला भेट म्हणून देण्यात आलेले सर्वात महागडे गिफ्ट होते, असं या अहवालात म्हटले आहे.
२०२३ या वर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला विविध देशांच्या नेत्यांकडून मोठ मोठी गिफ्ट मिळाले होते, असं या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेतील युक्रेनच्या राजदूताने जिल बायडेन यांना १४,०६३ डॉलर किमतीचा हार दिला होता. तर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीने ४,५१० डॉलर किंमतीचे ब्रेसलेट, हार आणि फोटो अल्बम मिळाला.
२०२३ सालात खुद्द राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना परदेशी नेत्यांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष सुक योल यून यांनी ज्यो बायडेन यांना ७१०० डॉलर्स किंमतीचा फोटो अल्बम भेट दिला होता, असं या अहवालात म्हटलं आहे. सुक योल यून यांच्यावर दक्षिण कोरियात नुकताच महाभियोग चालवण्यात आला होता.
मंगोलियाच्या पंतप्रधानांकडून ३,४९५ डॉलर किमतीचा मंगोलियन योद्ध्यांचा पुतळा, ब्रुनेईच्या सुल्तातानकडून ३,३०० डॉलर किंमतीचा चांदीचा वाडगा, इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांकडून ३,१६० हीर करणे डॉलर किमतीचा चांदीचा ट्रे आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याकडून २४०० डॉलर किमतीचा कोलाज भेट देण्यात आला होता.
अमेरिकेतील कायद्यांनुसार राष्ट्राध्यक्ष आणि त्याच्या कुटुंबीयांना ४८० डॉलरपेक्षा अधिक किमतीच्या भेटवस्तू मिळाल्यास त्या सार्वजनिकरित्या जाहीर करणे बंधनकारक असते.
४८० डॉलर या मूल्यमर्यादा ओलांडणाऱ्या भेटवस्तू या अमेरिकेच्या राष्ट्रीय अभिलेखागारात हस्तांतरित केल्या जातात. तर काही वस्तू या सरकारतर्फे अधिकृत प्रदर्शनासाठी ठेवल्या जात असल्याचे एपीच्या वृत्तात म्हटले आहे. विशेष म्हणजे भारतीय पंतप्रधानांनी भेट दिलेला २०,००० डॉलर किमतीचा हिरा हा व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगमध्ये ठेवून त्याच्या अधिकृत वापराची परवानगी देण्यात आली होती. तर इतर भेटवस्तू या अभिलेखागारात पाठविण्यात आल्या होत्या, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.
जानेवारी २०२५ महिन्याच्या अखेरीस ज्यो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद सोडणार आहे. त्यानंतर हा हिरा अमेरिकी सरकारच्या अभिलेखागाराकडे सुपूर्द केला जाईल, असे जिल बायडेन यांच्या प्रवक्त्या व्हेनेसा वाल्डिव्हिया यांनी सांगितले. मात्र, हा हिरा कोण वापरत होता आणि कशासाठी वापरला जायचा हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. अमेरिकन सरकारकडून बाजारभावानुसार या भेटवस्तू खरेदी करण्याचा पर्याय माजी राष्ट्राध्यक्षांना असतो.
अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएच्या अनेक अधिकाऱ्यांना महागडी घड्याळे, परफ्यूम आणि दागिनेसारख्या भेटवस्तू मिळल्याची माहिती परराष्ट्र खात्याच्या प्रोटोकॉल कार्यालयाच्या हवाल्याने दिली आहे. सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांना एका परदेशी सूत्राने १८ हजार डॉलर किमतीचा अॅस्ट्रोग्राफ हा टेलिस्कोप आणि ज्योतिषीय कॅमेरा आणि ११ हजार डॉलर किमतीचे ओमेगा घड्याळ भेट म्हणून मिळाले होते. दरम्यान, कॅमेरा अमेरिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सोपवण्यात येणार असून ओमेगा घड्याळ स्वतः बर्न्स यांनी नष्ट केले होते. सीआयएला या सर्व भेटवस्तूंची एकत्रित किंमत १,३२,००० डॉलरपेक्षा जास्त होती.
संबंधित बातम्या