रशियामधील घटत्या लोकसंख्येमुळे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन खुपच चिंतित आहेत. या समस्येतून सुटकारा मिळवण्यासाठी पुतीन यांनी अजब युक्ती शोधून काढली आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुतीन यांनी देशातील नागरिकांना ऑफिसमध्येच लंच ब्रेक व कॉफी ब्रेकमध्ये सेक्स करण्याचा सल्ला दिला आहे. रशियाचा प्रजनन दर प्रति महिला केवळ १.५ वर आल्याने पुतीन यांनी हे निर्देश दिले आहेत. रशियासाठी हे चिंतेची गोष्ट आहे, कारण देशातील लोकसंख्य दर स्थिर राखण्यासाठी तेथील महिलांचा प्रजनन दर कमीत कमी २.१ असला पाहिजे.
दरम्यान, रशियाचेआरोग्यमंत्री डॉ. येवगेनी शेस्टोपालोव यांनी गोष्टीवर जोर दिला आहे की, मुले जन्माला घालण्यासाठी काम (Work)अडथळा ठरू नये. त्यांनी रशियन लोकांना आवाहन केले आहे की, आपले कुटूंब वाढवण्यासाठी कार्यालयामध्ये लंच व चहाच्या ब्रेकमध्येही सेक्स करा. त्यांनी म्हटले की, कामात व्यस्त असणे सेक्स न करण्याचे वैध कारण होऊ शकत नाही. हा केवळ सेक्सपासून वाचण्याचा बहाना आहे. तुम्ही जेवणाच्या सुट्टीत सेक्स करू शकता. कारण जीवन खूपच गतीने जात आहे.
त्यांनी सांगितले की, मॉस्कोमध्ये १८ ते ४० वर्ष वयोगटातील महिलांना त्यांचे प्रजनन आरोग्य व क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी मोफत प्रजनन तपासणी करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. इतकेच नाही तर रशियाच्या चेल्याबिंस्क परिसरात सरकारने जन्मदर वाढवण्यासाठी आर्थिक मदत करायला सुरुवात केली आहे. येथे २४ वर्षाहून कमी वयाच्या महिलांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर १.०२ लाख रुबल (९.४०लाख रुपये) मदत म्हणून दिले जात आहेत. देशात गर्भपात करण्यावर बंदी लादली जात आहे. राजकीय नेते व धार्मिक नेत्यांनी जनजागृती करायला सुरूवात केली आहे की, महिलांची पहिली जबाबदारी मुलांना जन्म देणे व त्यांचे पालन-पोषण करणे आहे.
रशियात घटस्फोटासाठी असणाऱ्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार रशियाने २०२४ च्या पहिल्या सहामाहीत २५ वर्षातील सर्वात कमी जन्मदराची नोंद केली आहे. आकडेवारीवरून समोर आले आहे की, जूनमध्ये जन्मदर पहिल्यांदा एक लाखाहून खाली गेला आहे.
AFPनुसार क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी जुलै महिन्यात सांगितले होते की, जानेवारी ते जून २०२४ दरम्यान रशियात एकूण ५,९९,६०० मुले जन्मली होती. हा आकडा २०२३ मधील या कालावधीच्या तुलनेत १६ हजारांनी कमी आहे. ही आकडेवारी देशाच्या भविष्यासाठी विनाशकारी आहे. जन्मदर निचांकी पातळीवर आहे. यूक्रेनसोबत युद्ध सुरु असल्याने रशियाच्या लोकसंख्येत घट झाली आहे. युद्धामुळे रशियातून १० लाख लोक देश सोडून गेले आहेत, त्यामध्ये अधिकतर युवक आहेत.