मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  President Draupadi Murmu: 'जनतेचं कल्याण हेच ध्येय', राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

President Draupadi Murmu: 'जनतेचं कल्याण हेच ध्येय', राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 25, 2022 10:21 AM IST

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. देशाच्या त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

President Draupadi Murmu: नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना मला ही जबाबदारी मिळाली हे माझं सौभाग्य असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अशा पहिल्या राष्ट्रपती आहेत ज्यांचा जन्म देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला आहे. याचाही उल्लेख राष्ट्रपती मुर्मू यांनी शपथ घेतल्यानंतर बोलताना केला. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास आणि जनतेचं कल्याण हेच माझं ध्येय असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.

देशाला राष्ट्रपतींची महान परंपरा लाभली आहे. पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद यांच्यासारख्या महान व्यक्तींनी हे पद भूषवलं आहे. आता मला हा सन्मान मिळाला असून त्यासोबत एक दायित्वही असणार आहे.गांधीजींनी आपल्याला स्वराज्य, स्वदेशी, स्वच्छता आणि सत्याग्रहातून आपल्याला मार्ग दाखवला होता असंही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

शपथविधीआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजघाटावर जावून राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती भवनात मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर दोघेही ससंदेत आले. 

द्रौपदी मुर्मू या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. २०१५-२०२१ याकाळात त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला. मुर्मू यांचे शालेय शिक्षण भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून झाले. १९९७ मध्ये त्या नगरसेवक तर २००४ मध्ये द्रौपदी मुर्मू या रायरंगपूर, ओडिशा येथून आमदार झाल्या.

IPL_Entry_Point