मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर; रामलल्ला दर्शन, शरयू पूजन, असा आहे संपूर्ण कार्यक्रम!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर; रामलल्ला दर्शन, शरयू पूजन, असा आहे संपूर्ण कार्यक्रम!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 30, 2024 11:26 PM IST

Draupadi Murmur Ayodhya Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या अयोध्या दौऱ्यावर येणार असून आपल्या तीन तासांच्या दौऱ्यात त्या राम लल्ला दर्शन, शरयू पूजन व हनुमानगढी मंदिरात आरती करणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर

Draupadi murmur Ayodhya Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी (१ मे) अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे अयोध्योतील महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ४ वाजता आगमन होईल. तेथून त्या हनुमानगढीकडे रवाना होतील. सायंकाळी ४.५० वाजता त्या हनुमानगढी मंदिरात आरती (hanumangarhi temple aarti ) करतील. त्यानंतर सायंकाळी पावणे सहा वाजता शरयू नदी पूजन (Saryu pujan ) आणि आरती करतील. तेथून त्या रामजन्मभूमीत दाखल होऊन सायंकाळी ६.४५ वाजता रामलल्लाचे दर्शन करून आरतीमध्ये सामील होती. सायंकाळी ७.१५ वाजता त्या कुबेर टीलाचे दर्शन करतील. त्यानंतर विमानतळावरून नवी दिल्लीकडे प्रयाण करतील. राष्ट्रपतीचे प्रेस सचिव अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींच्या सर्व कार्यक्रमांचे दूरदर्शन नॅशनल न्यूज चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

अयोध्येत भव्य राम मदिर निर्माण झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmur )  पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) हस्ते रामललांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर भाविक रामललांच्या दर्शनासाठी येत आहेत. प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित केले नसल्याने विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.  

दरम्यान आता राष्ट्रपतींचा अयोध्या दौरा निश्चित झाल्यानंतर राम मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भातील तयारी संदर्भात माहिती दिली आहे. राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य भाविकांनाही या दिवशी रोजच्या प्रमाणेच रामललांचे दर्शन आणि पूजन करता येणार आहे. 

राष्ट्रपती मुर्मू विशेष विमानाने सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांना व्हीआयपी गेटने मंदिर परिसरापर्यंत आणले जाईल. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या मते राष्ट्रपती जवळपास तीन तास आयोध्येत असणार आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही विमानतळावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त बुधवारी अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहेत. विमानतळापासून राम मंदिर व शरयू किनारी सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. मंगळवी पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा एजन्सी व अन्य जवानांसोबत सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम केली.

IPL_Entry_Point