
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७५ व्या प्रजास्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशाला उद्देशून भाषण केले. त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा देताना म्हटले की, उद्या देश संविधानाचा उत्सव साजरा करेल. राष्ट्रपतींनी म्हटले की, संविधानाची प्रस्तावना आम्ही भारताचे नागरिक या वाक्यने सुरू होते. हे शब्द आपल्या संविधानाचे मूलभूत तत्व आहेत. आपल्या देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात राष्ट्रपतींनी म्हटले की, भारतीय स्वातंत्र्य शताब्दीकडे वाटचाल करताना अमृत काळाच्या प्राथमिक अवस्थेतून जात आहे.
राष्ट्रपतींनी नारी शक्ती वंदन कायदा हा क्रांतिकारी उपक्रम असल्याचे वर्णन केले. त्या म्हणाल्या, मला विश्वास आहे की नारी शक्ती वंदन कायदा हा महिला सक्षमीकरणासाठी एक क्रांतिकारी उपक्रम ठरेल. देशातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ उच्च उद्दिष्टे साध्य करत आहेत.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, उद्या आपण संविधान लागू झाल्याचा उत्सव साजरा करणार आहोत. याची प्रस्तावना "आम्ही भारताचे नागरिक " शब्दाने सुरू होते व आपल्या लोकशाहीवर प्रकाश टाकते.
आपला देश अमृत काळाच्या प्रारंभिक काळात आहे. बदलाची वेळ आली आहे. देशाला नव्या उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळाली आहे. आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असेल.
संबंधित बातम्या
