मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Soundararajan : सुदृढ बाळासाठी महिलांना सुंदरकांड, रामायण वाचण्याचा सल्ला; तेलंगणच्या राज्यपाल वादात

Soundararajan : सुदृढ बाळासाठी महिलांना सुंदरकांड, रामायण वाचण्याचा सल्ला; तेलंगणच्या राज्यपाल वादात

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jun 12, 2023 02:30 PM IST

Tamilisai Soundararajan: तेलंगणाच्या राज्यपाल मिलिसाई सुंदरराजन यांनी सुदृढ बाळासाठी महिलांना सुंदरकांड, रामायण वाचण्याचा सल्ला दिला आहे.

Tamilisai Soundararajan (Photo Credit: ANI)
Tamilisai Soundararajan (Photo Credit: ANI)

Telangana Governor: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित प्रमोशनल ट्रस्ट संस्थेच्या ‘गर्भ संस्कार’ (Garbh Sanskar) कार्यक्रमादरम्यान तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन (Tamilisai Soundararajan) यांनी गर्भवती महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी गर्भवती महिलांना सुदृढ बाळासाठी सुंदरकांड (Sunderkand) आणि रामायण (Ramayana) वाचण्याचा सल्ला दिला.

तमिलिसाई सुंदरराजन म्हणाल्या की, "खेड्यात आपण गरोदर माता रामायण, महाभारत आणि इतर महाकाव्यांसह चांगल्या कथा वाचताना पाहतो. विशेषत: तामिळनाडूमध्ये गर्भवती महिलांनी कंबा रामायणातील सुंदरकांड वाचायला सांगितले जाते. गरोदरपणात 'सुंदरकांड'चा जप करणे मुलांसाठी आरोग्यदायक ठरते. सुंदरकांड हा हिंदू महाकाव्य 'रामायण' चा एक अध्याय आहे, ज्यात भगवान हनुमानाची कृत्ये आणि त्यांची निःस्वार्थता, शक्ती आणि भगवान रामाबद्दलची भक्ती दर्शविली आहे."

मातृत्वाचे महत्त्व आणि गर्भसंस्काराचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या की, "गर्भधारणेदरम्यान योगाभ्यास केल्याने गर्भवती माता आणि त्यांच्या गर्भशयात वाढणाऱ्या बाळासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्या उत्तम ठरेल. तसेच महिलांना सामान्य प्रसूतीसाठी अधिक फायदेशीर ठरेल.

संवर्धिनी न्यास कार्यक्रमात भगवद्गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे वाचन, संस्कृत मंत्रांचा जप आणि योगाभ्यास यांचा समावेश असेल. ही प्रक्रिया गर्भधारणेपूर्वी सुरू होईल आणि मूल दोन वर्षांचे होईपर्यंत चालू राहील. 'गर्भ संस्कार' या धोरणेनुसार, गर्भवती मातांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन केले जाईल. 'संवर्धिनी न्यास' ही एक महिला संघटना आहे जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमाणेच राष्ट्रसेविका संघाची शाखा आहे.

WhatsApp channel

विभाग