डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गरोदर महिलांमध्ये दहशत! तारखेच्या आधीच बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात धाव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गरोदर महिलांमध्ये दहशत! तारखेच्या आधीच बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात धाव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गरोदर महिलांमध्ये दहशत! तारखेच्या आधीच बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात धाव

Jan 23, 2025 12:36 PM IST

Donald Trump Decision : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गरोदर महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सध्याच्या नियमानुसार एखाद्या मुलाचा जन्म अमेरिकेत झाला असेल व त्याचे आई-वडील दुसऱ्या देशाचे असतील तर त्यांच्या मुलाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळत होते. तसेच पालकांना देखील अमेरिकन नागरिकत्व मिळत होते.

डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयामुळे गरोदर महिलांमध्ये दहशत! प्रसूती तरखेपूर्वीच प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात धाव
डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयामुळे गरोदर महिलांमध्ये दहशत! प्रसूती तरखेपूर्वीच प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात धाव

Donald Trump Decision : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्माने नागरिकत्व देण्याच्या निर्णय रद्द करण्याची भूमिका घेतल्याने गरोदर महिलांची चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रसूतीपूर्व तारखेच्या आधीच बाळाला जन्म देण्यासाठी या महिला दवाखान्यात धाव घेत आहेत. अमेरिकेचा नवा कायदा हा २० फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे हा कायदा लागू होण्यापूर्वी अनेक गरोदर महिलांना बाळाला जन्म द्यायचा आहे.  ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अनेक अमेरिकन नागरिकांचा या निर्णयाला विरोध असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना न्यू जर्सीचे डॉ. डी. रामा यांनी सांगितलं की, त्यांच्या रुग्णालयात मुदतपूर्व बाळाला जन्म देण्यासाठी  गरोदर महिलांची संख्या वाढली आहे. यापैकी बहुतेक महिला या भारतीय आहेत. सध्या या माहीला गरोदरपणाच्या ८ व्या किंवा ९ व्या महिन्यात आहेत. या सर्वांना २० फेब्रुवारीपूर्वी सी-सेक्शन करून घ्यायचे आहे. विशेष म्हणजे अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या प्रसूतीला अजून काही महिने शिल्लक आहेत, मात्र असे असतांना त्यांना प्रसूती करून घ्यायची आहे.

एक सात महिन्यांची गरोदर असलेली एक महिला डी. रामा यांच्या रुग्णालयात पतीसोबत आली होती. तसेच तिला मुदतपूर्व प्रसूती करायची होती. या महिलेची डिलिव्हरी मार्चमध्ये होणार आहे. मात्र, २० फेब्रुवारीनंतर अमेरिकेचे नागरिक किंवा ग्रीन कार्डधारक नसलेल्या पालकांच्या मुलांना आपोआप नागरिकत्व मिळणार नाही. त्यामुळे अनेक महिला या मुदत पूर्व प्रसूती करण्यासाठी तयार झाल्या आहेत.

टेक्सासचे डॉक्टर एस. जी. मुक्कल म्हणाले, "अनेक जोडप्यांना मी या बाबत यातील धोके सांगात आहे. मुदतपूर्व प्रसूती शक्य असली तरीही आई व बाळाला यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आधीच प्रसूती केल्याने नवजात बाळांमध्ये अविकसित फुफ्फुसे, कमी वजन, न्यूरोलॉजिकल समस्या आणि बरेच काही समस्या त्यांना होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत अशा १५-२० जोडप्यांशी त्यांनी या बाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

मार्चमध्ये बाळाला जन्म देणाऱ्या एका महिलेने सांगितले की, "आम्ही आमच्या ग्रीन कार्डची सहा वर्षे वाट पाहत होतो. कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. आम्हाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही अशी आता भीती वाटू लागली आहे. आठ वर्षांपासून अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका व्यक्तीने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. आम्हाला वाटलं की आम्ही अमेरिकेत निर्वासित होऊ, पण नंतर माझी पत्नी गरोदर राहिली. आमच्या मुलाच्या जन्माच्या माध्यमातून आम्हाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याची आशा होती. मात्र, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आता ही शक्यता देखील मावळली आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर