धक्कादायक..! प्रसूती वेदनेने तळमळू लागली महिला, तरीही सुट्टी देण्यास अधिकाऱ्याचा नकार; त्यानंतर अघटित घडलं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक..! प्रसूती वेदनेने तळमळू लागली महिला, तरीही सुट्टी देण्यास अधिकाऱ्याचा नकार; त्यानंतर अघटित घडलं

धक्कादायक..! प्रसूती वेदनेने तळमळू लागली महिला, तरीही सुट्टी देण्यास अधिकाऱ्याचा नकार; त्यानंतर अघटित घडलं

Published Oct 31, 2024 12:13 AM IST

सीडीपीओ स्नेहलता साहू यांनी आपल्याशी अमानुष वागणूक दिल्याचा आरोप प्रियदर्शनी यांनी केला आहे. पीडित प्रियदर्शनी यांनी जिल्ह्यातील डीएम आणि एसपीकडे लेखी तक्रार दिली आहे.

अधिकाऱ्याच्या अमानुषतेने महिलेने गमावले बाळ
अधिकाऱ्याच्या अमानुषतेने महिलेने गमावले बाळ

ओडिशामध्ये एका महिला अधिकाऱ्याच्या अमानुष वागणुकीमुळे तिच्या हाताखाली काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला  मोठी किंमत मोजावी लागली आहे. महिला कर्मचारी गरोदर होती आणि प्रसूती वेदनेने तडफडत होती, परंतु रजा मागितल्याने आणि रुग्णालयात नेण्याची विनंती करूनही अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याला रजा दिला नाही किंवा तिला रुग्णालयातही नेले नाही. यामुळे तिच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. या प्रकरणात ही अधिकारी स्वत: एक महिला असतानाही तिने अमानुषपणाची मर्यादा ओलांडली आहे. ओडिशा सरकारने या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर संबंधित आरोपी अधिकाऱ्याला पदावरून हटवले आहे.

हे प्रकरण ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील डेराबिस ब्लॉकमधील आहे, जिथे २६ वर्षीय वर्षा प्रियदर्शिनी बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) कार्यालयात लिपिक म्हणून काम करत होती. सीडीपीओ स्नेहलता साहू यांनी आपल्याशी अमानुष वागणूक दिल्याचा आरोप प्रियदर्शनी यांनी केला आहे. पीडित प्रियदर्शनी यांनी जिल्ह्यातील डीएम आणि एसपीकडे लेखी तक्रार दिली आहे.

प्रियदर्शनीने लिहिले आहे की, सीडीपीओ गेल्या तीन वर्षांपासून आपल्याला त्रास देत आहे.  मी गरोदर आहे हे माहीत असूनही सीडीपीओने माझ्याशी अमानुष वागली. ती मला सतत त्रास देत होती. त्याच्या छळामुळे मी माझे मूल गमावले आहे. प्रियदर्शनी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, घटनेच्या दिवशी ऑफिसमध्ये काम करत असताना प्रसूतीवेदना होऊ लागल्या. त्यावेळी तिने सीडीपीओ स्नेहलता साहू आणि इतर कर्मचाऱ्यांना रुग्णालयात नेण्याची विनंती केली परंतु सीडीपीओने तिच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही.

यानंतर तिचे कुटुंबीय कार्यालयात आले आणि प्रियदर्शनीला रुग्णालयात घेऊन गेले पण तोपर्यंत उशीर झाला होता. बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रियदर्शनी यांनी आपल्या तक्रारीत सीडीपीओवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री पार्वती परिदा यांनी सीडीपीओ साहू यांना तूर्तास पदावरून हटवण्यात आल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणाच्या निःपक्षपाती चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

प्रियदर्शनीने सुट्टीचा अर्ज न दिल्याचा साहू यांचा आरोप -

दुसरीकडे, सीडीपीओने हे आरोप फेटाळून लावले आणि प्रियदर्शनीने रजेसाठी अर्ज केला नसल्याचे सांगितले.  साहू यांनी असा ही दावा केला आहे की, त्यांनी कधीही तिला त्रास दिला नाही परंतु तिच्या कुटुंबीयांनी गैरवर्तन केले आहे. या घटनेची माहिती मिळताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्याच्या या वागणुकीचा लोक संताप व्यक्त करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर