Mahakumbh Traffic Jam Video : प्रयागराजमध्ये उसळला जनसागर, येण्या-जाण्याचे सर्व मार्ग बंद, वाहतूक कोंडीने भाविकांचे हाल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mahakumbh Traffic Jam Video : प्रयागराजमध्ये उसळला जनसागर, येण्या-जाण्याचे सर्व मार्ग बंद, वाहतूक कोंडीने भाविकांचे हाल

Mahakumbh Traffic Jam Video : प्रयागराजमध्ये उसळला जनसागर, येण्या-जाण्याचे सर्व मार्ग बंद, वाहतूक कोंडीने भाविकांचे हाल

Updated Feb 10, 2025 04:39 PM IST

Mahakumbh Traffic Jam Video : महाकुंभ प्रशासना द्वारे प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.५१ कोटीहून अधिक भाविकांनी गंगा संगमात स्नान केले. १३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत ४३.५७ कोटीहून अधिक भाविकांनी महाकुंभात स्नान केले आहे.

प्रयागराजच्या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी
प्रयागराजच्या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी

Mahakumbh Traffic Jam Video : प्रयागराजमध्ये रविवारी महाकुंभ मेळ्याच्या मार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम होते. प्रयागराज संगम रेल्वे स्टेशनच्या बाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमल्याने स्टेशन बंद करण्यात आले. महाकुंभ प्रशासना द्वारे प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.५१ कोटीहून अधिक भाविकांनी गंगा संगमात स्नान केले. १३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत ४३.५७ कोटीहून अधिक भाविकांनी महाकुंभात स्नान केले आहे.

प्रयागराज महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. गर्दीचा ताण इतका आहे की, संगमाकडे जाणारा प्रत्येक रस्ता जॅम झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून प्रयागराज शहराकडे जाणारी वाहनेही रेंगाळत आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी आहे. शहराला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर कोंडी होत असल्याने कुंभमेळ्यापर्यंत जाण्यासाठी नागरिकांना २० ते २५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.

प्रयागराजकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा -

प्रयागराजला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते वाराणसी, जौनपूर, मिर्झापूर, कौशांबी, प्रतापगड, रीवा आणि कानपूर मार्ग आहेत. वाहनांमध्ये अडकलेल्या भाविकांना मेळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना तासनतास अन्न व पाण्यावाचून रहावे लागत आहे. शहराबाहेरील महामार्गालगत प्रशासनाने स्वतंत्र वाहनतळ तयार केले आहेत. मात्र, बहुतांश वाहनतळ भरल्याने वाहने रस्त्यावरच अडकून पडली आहेत. ही प्रचंड कोंडी दूर करण्यासाठी नागरी आणि वाहतूक पोलिसांबरोबरच निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे. येथे बालसन चौक, छोटा बघरा, बांगर धर्मशाळा चौक, जनसनगंज चौक अशा प्रमुख ठिकाणी चालणेही अवघड झाले आहे.

अखिलेश यांनी पोस्ट करत लिहिले की, भाविकांचे हाल कोणी पाहणार का?

दरम्यान, सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या जामवर ट्विट करत सरकारवर हल्ला बोल केला आहे. अखिलेश यांनी पोस्ट करत लिहिले की, 'भक्तांच्या राज्यात कोणी आहे का?

अखिलेश यादव यांनी लिहिले की, जाममध्ये अडकलेल्या लोकांना तासनतास त्यांच्या वाहनांमध्ये कैद आहेत. महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठीही जागा नाही. वाटेत जे बेशुद्ध पडत आहेत, त्यांची काळजी घेण्याची व्यवस्था नाही. यात्रेकरूंच्या मोबाइल फोनच्या बॅटरी संपल्याने त्यांच्या प्रियजनांशी संपर्क तुटला आहे. संपर्क आणि माहितीच्या अभावामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जबाबदार मंत्री किंवा व्यक्ती दिसत नाही. मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, तसेच उपमुख्यमंत्री आणि प्रयागराजशी संबंधित अनेक प्रमुख मंत्री गैरहजर आहेत. ज्यांना लोकांमध्ये असायला हवे होते ते आपापल्या घरात बसले आहेत. दिवसरात्र उपाशी-तहानलेले काम करणारे सैनिक, चतुर्थश्रेणी कर्मचारी किंवा सफाई कर्मचारी यांच्यासाठी अन्न-पाण्याची व्यवस्था नाही. अधिकारी खोल्यांमध्ये बसून आदेश देत आहेत, पण जमिनीवर उतरत नाहीत.

प्रयागराजच्या रहिवाशांना घाण, वाहतूक कोंडी आणि महागाईशिवाय काहीच मिळालेले नाही. सगळीकडे वाईट व्यवस्था पसरली आहे, हे माहीत असताना सर्वप्रथम भाविक का येत आहेत, असा आरोप आता भाजपकडून भाविकांवर केला जात असल्याचे ऐकिवात आहे. कोणी राज्यात अपघातात मरण पावलेल्या लोकांना तेथेच सोडून दुसऱ्या राज्यात समारंभाला हजेरी लावत आहे, कोणी परदेशात जात आहे, कोणी भक्तांच्या कल्याणासाठी आहे का?

 

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर